Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सर्वत्र चर्चेचा विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाभार्थी महिलांना साथ हप्ते मिळाले आहेत. यानंतर सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष आठवे हप्त्यावर म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे हप्त्यावर लागले आहे. दरम्यान फेब्रुवारी चा हप्ता कधी मिळणार याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे कारण, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. Majhi Ladki Bahin Yojana
ज्या कुटुंबाची आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मागील वर्षाच्या जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण दहा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत. यानंतर फेब्रुवारी चा हप्ता देखील आता लवकरच महिलांना मिळण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे.
हे पण वाचा | मोठी बातमी! सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; पहा आजचे दहा ग्रॅम सोन्याचे नवीन दर
काय म्हणाले अजित पवार?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे आता राज्यातील सर्व महिलांचे लक्ष लागले आहे याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी मदत केली आहे मी इथे येण्यापूर्वीच चेकवर सही करून आलो आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा केला जाईल. पुढील आठ दिवसात लाडक्या बहिणीच खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितले आहे की ही योजना बंद होणार नाही आणि मी देखील सांगत आहे. ही योजना कधीच बंद होणार नाही उलट या योजनेत अधिकाधिक सुधारणा कशी करता येईल आणि जास्तीत जास्त महिलांना कसा लाभ देता येईल याबाबत आमचे सरकार विचार करेल असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार 8व्या हप्त्याचे 1500 रुपये; तारीख आली समोर..
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार?
दरम्यान आमचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या बड्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीदरम्यान करण्यात आली होती. विधानसभा च्या निकालामध्ये लाडक्या बहिणींमुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्व राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. मात्र राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तीन मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे दरम्यान लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा | शेतकरी ओळखपत्र कसे काढावे, कोणती कागदपत्र आवश्यक? जाणून घ्या सविस्तर माहिती
अनेक महिला अपात्र
दरम्यान या योजनेची काटेकोरपणे पडताळणी केली जात आहे. या योजनेचे निकष न पाळणाऱ्या महिला या योजनेतून अपात्र ठरवल्या जात आहेत. या योजनेत निकषाचे पालन न करता बऱ्याच महिलांनी लाभ घेतला आहे हे लक्षात आल्यानंतर या योजनेची पडताळणी काटेकोरपणे केली जात आहे. यानंतर आता या योजनेत न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून अपात्र ठरवले जात असून या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही. पडताळणी दरम्यान या योजनेतून पाच लाखापेक्षा जास्त महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहेत.