Maharashtra Weather Alert: आज या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनो सावध राहा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Alert : अहिल्यानगरमध्ये वादळी पावसाचा इशारा, उष्णतेचा कहरही कायम राज्यात एकीकडे कडक उन्हाची लाट सुरू असतानाच दुसरीकडे वादळी पावसाने काही जिल्ह्यांत हजेरी लावली आहे. मे महिन्यात हवामानात मोठा बदल दिसून येतोय. १५ मे रोजी म्हणजेच आज नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह वादळी पावसाचा धोका निर्माण झालेला आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यांनाही वादळी पावसाचा धोका असल्याने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.Maharashtra Weather Alert

मध्य महाराष्ट्रात पावसाचं सावट, काही ठिकाणी आधीच जोरदार हजेरी

सध्या राज्यात पूर्वमोसमी पावसाचं वातावरण तयार झालं आहे. कोकणापासून ते विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये चक्राकार वारे आणि कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी मे महिन्याच्या मध्यातच ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि अचानक कोसळणारा वादळी पाऊस अनुभवायला मिळतोय. विशेष म्हणजे काही भागांमध्ये गारपीटही झाली आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट –गारपीट आणि वादळी पाऊस

नाशिक, सातारा, अहिल्यानगर (अहमदनगर),पुणे

या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट – वाऱ्यांसह पावसाची शक्यता

पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

एकीकडे उष्णतेचा कहर – तापमान पुन्हा ४० अंशांच्या वर

राज्यात पावसाबरोबरच कडक उन्हाची लाटही कायम आहे. बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी इथे राज्यातील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर ४१.२ अंश, वर्धा ४० अंश, तर धुळे, सोलापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर येथेही तापमान ३९ अंशांच्या पुढे गेलं. जेऊर, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये तापमान ३८ अंशांच्या आसपास होते.

पावसामुळे काहीशी थोडी थंडावट, पण गारपीट आणि वाऱ्यांचा धोका कायम

राज्याच्या काही भागांत अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा जाणवला असला, तरी गारपीट आणि वादळी वाऱ्यांचा धोका अजूनही आहे. त्यामुळे शेतकरी, छोटे व्यावसायिक, घरकाम करणाऱ्या स्त्रिया आणि प्रवाशांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडताना आकाशाकडे लक्ष द्या, अनावश्यक प्रवास टाळा आणि मोबाइलवर हवामान अपडेट्स पाहत राहा.

टीप: शेतकऱ्यांवरील हवामान अंदाज हा ताजा अपडेट नुसार आहे हवामान खात्याचा नवनवीन अपडेट जाहीर होत असतो त्यामुळे अंदाज कुठेही दवा केला जात नाही योग्य हवामान अंदाज साठी भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटचा व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करा.

हे पण वाचा | मान्सून अंदमानमध्ये वेळेआधीच पोहचला, महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट!

Leave a Comment