Loan Waiver List | नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे शेती करण्यासाठी अनेक बँकेमधून कर्ज घेत असतात, तर आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज हे माप होणार आहे.
तर ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अमरावती या जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी घेण्यात आली आहे. व त्यामध्ये अमरावती या जिल्ह्यांमधील मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना व्याजमापी देण्याचा हा अत्यंत मोठा निर्णय हा घेतलेला आहे.
अमरावती जिल्ह्यामधील मध्यवर्ती बँकेअंतर्गत घेण्यात आलेला व्याजमाफीचा मोठा निर्णयामुळे जिल्ह्यातील 50 हजार शेतकऱ्यांना याचा खूप मोठा लाभ होणार आहे. आणि याबद्दलची घोषणा ही बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे बँकेअंतर्गत 6 टक्के व्याजाची रक्कम ही आता जमा करण्यात येत आहे.
तर यामधील जे शेतकरी 31 मार्च पर्यंत कर्ज भरतील अशा शेतकऱ्यांना या पीककर्ज व्याज माफीचा लाभ हा भेटणार आहे. व या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा खूपच जास्त प्रमाणावर झालेला आहे.
बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यामधील मध्यवर्ती बँके अंतर्गत घेतलेला या पीक कर्ज व्याजमाफीचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा असून, असा या बँकेने पहिल्यांदाच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. आणि या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना या पीक कर्जाचा आर्थिक बोजा हा कमी होणार आहे.