Thursday

13-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रात पुन्हा शेतकरी कर्जमाफी होणार, वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan waiver for farmer : आता झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूपच नुकसान झालेले आहे. या नुकसान झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ 1,851 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा विधानसभेत केली आहे. सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी धनांसाठी दोन हेक्टर च्या मर्यादित 15,000 नियोजित 20,000 रुपये मदत देण्याची घोषणा केली. व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. “छत्रपती शिवाजी महाराज” कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार, असून तेथील साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आपल्या सरकारने केवळ एक रुपयातच पिक विमा देण्याचा निर्णय घेतला, आणि पिक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत देखील तब्बल 177 टक्के वाढ झाली आहे. या एक कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवलां आहे. व राज्य सरकारने त्यासाठी 51 74 कोटी रुपयांची मदत केली आहेत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे.

सध्या अग्रीम रकमेसाठी पिक विमा कंपन्यांकडून 2,121 कोटी रुपये इतकी, रक्कमंजूर करण्यात आली, आणि त्यापैकी 12,17 कोटी रुपयांची अग्रीम वाटप करण्यात आली आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यांच्या भाषणादरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका कर केली आम्ही बांधावर जाऊन पाहणी करतो, घरात बसून फेसबुक वर लाईव्ह करत नसल्याचा टोला शिंदे यांनी लगावला.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास सध्या सुरू आहेत. 32 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार राहिलेले आहेत.

आतापर्यंत 9 लाख 75 हजार 59 हेक्टरचे क्षेत्र बाधितं झाले आहे. यासाठी अंदाजे दोन हजार कोटींची मदत द्यायचें आहे. जसजसे पंचनामे पूर्ण होतील, तसतशी मदत डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधी पक्षांकडून मोठा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुन्याच घोषणा व आकड्यांचा खेळ करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पळ काढत आहेत. अग्रीमच्या नावाखाली शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात आलेला नाही. आता शेतकऱ्यांना 1,553 रुपयांची अग्रीम दिल्याचे सांगत आहे. हे रक्कम त्यांना खूप मोठी वाटत असेल, तर मुख्यमंत्री व कृषिमंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळ शेतकऱ्यांबाबत सरकार किती संवेदनशील आहे. हे यावरून दिसून येते, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *