तुरीचे बाजार भाव दहा हजाराच्या घरात, पण तज्ञांनी केली चिंता व्यक्त, वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Market Price : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय कामाची महत्त्वाची बातमी आहे. खास तर तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी ठरणार आहे. राज्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीन कापूस या मुख्य पिकांचे लागवड केली जाते. तसेच यामध्ये तूर पिकांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते. तूर लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक जास्त आहे.

राज्यामध्ये यंदा सरकारी पेक्षा कमी पाऊस झाल्याने तुरीचे उत्पादनात जवळपास 50% पर्यंतघट आली आहे. यामुळे तज्ञ लोकांच्या माध्यमातून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे आणि हवामान बदलामुळे तुर पिकावर आलेल्या वेगवेगळ्या किटकामुळे आणि रोगामुळे तुरीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची भीती यावेळी तज्ञ लोकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

सध्या राज्यामध्ये तुर उत्पादक शेतकरी चालू हंगामातील तूर मोठ्या प्रमाणामध्ये काढणी करत आहेत. विशेष म्हणजे हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर शेतकरी बांधव लगेच तरी बाजारात विक्री करण्यास सुरुवात देखील केली आहे.

यंदा बाकी पिकांनी भरघोसाचे उत्पन्न दिले नाही. व कापूस सारखे पिकांचे भाव दाबावात असताना. शेतकऱ्यांना पैशाची निकड असल्याने बहुतांशी शेतकरी बांधव तुरीची हार्वेस्टिंग पूर्ण झाल्याबरोबरच लगेच विक्री करण्यास सुरुवात करणार आहे. याच दरम्यान अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील नवीन तुरीची आवक वाढू लागलेली आहे.

बाजारामध्ये नवीन तुरीची आवक होत आहे. पण बाजार भाव अजून दबावत आहे. तुरीचे सरासरी दर 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी आहेत.

पण गेल्या काही दिवसांपूर्वी तुरीचे भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक नमूद केले होते. सरासरी बाजार भाव मध्ये 10000 च्या जवळ पास भावना नमूद केले जात होत. यामुळे सध्याचे बाजारभाव हे दबावत असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल सहा जानेवारी रोजी लिलावात तुरीला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल 9 320 रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 8 हजार 550 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.

व्यापारी दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या माध्यमातून बाहेरील देशातून तुरीची आयात सुरू असल्याने. सध्या देशांतर्गत तुरीची उपलब्ध अधिक प्रमाणात पाहायला मिळत असून, याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शेतामध्ये सध्या तूरीचे हार्वेस्टिंग सुरू आहे. यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात तुरीची हार्वेस्टिंग होणार आहे. परिणामी बाजारात तुरीची आवक वाढणार यात शंकाच नाही.

तज्ञांच्या मते आवक वाढल्यानंतर तुला काय भाव मिळतो. हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे .आतापासूनच भविष्यातील काय भाव मिळणाऱ्या बाबत माहिती देता येणे अशक्य असल्याचा तज्ञांनी सांगितले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!