Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात सर्वत्र चर्चा सुरू आहे. याच चर्चा विषयी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ही योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्यापर्यंत दहा हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांबाबत पडताळणी विविध विभागाच्या साहने केली जात आहे.