Business Idea: सध्या प्रत्येक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतात. जर तुम्ही देखील असा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत जो पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुम्ही सुरू करू शकता आणि त्यातून तुम्ही जबरदस्त कमाई करू शकता.
पोस्ट ऑफिस सोबत व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर पोस्ट ऑफिस तुम्हालाही संधी उपलब्ध करून देत आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी केवळ पाच हजार रुपयांचे भांडवल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. फ्रेंचायझी मिळाल्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिस ची संबंधित विविध कामे पार पाडावी लागतील. ज्यामधून तुम्हाला कमाई करता येईल. पोस्ट ऑफिसच्या फ्रेंचायझी मधून तुम्ही चांगला नफा मिळू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या दोन प्रकारच्या फ्रेंचायझी उपलब्ध आहेत
पोस्ट ऑफिस दोन प्रकारच्या फ्रेंचायझी उपलब्ध करून देते. यामधील पहिली म्हणजे पोस्ट ऑफिस आउटलेट फ्रेंचायझी आणि दुसरी म्हणजे पोस्टल एजंट फ्रेंचायझी. ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस नाही, त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आउटलेट सुरू करता येते. तसेच जर तुम्ही पोस्टल स्टॅम्प स्पीड पोस्ट डिलिव्हरी यासारखे कामे करू इच्छित असाल तर पोस्टल एजंट फ्रेंचायझी निवडू शकता.
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आउटलेट फ्रॅंचाईजी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे किमान 200 स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणावरून तुम्ही आउटलेट सुरू करू शकता. तसेच यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा करावे लागतील. दुसऱ्या प्रकारच्या पंचायतीमध्ये थोडे अधिक भांडवल गुंतवावे लागेल, कारण त्यात पोस्ट ऑफिस तुम्हाला स्टॅम्प आणि इतर स्टेशनरी पुरवेल. स्पीड पोस्ट मनी ऑर्डर यासारख्या सेवा पुरवण्याने तुम्हाला दर महिन्याला चांगला नफा मिळू शकतो. पोस्ट ऑफिस या सेवेवरून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग तुम्हाला कमिशन म्हणून देते, जे हजारो रुपयांपर्यंत जाऊ शकते.
कोणताही अठरा वर्षे पेक्षा जास्त वयाचा तरुण व्यक्ती हा फ्रेंचायझी घेऊ शकतो. अर्ज दराने किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी कोणतेही तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता नाही. तुम्हीही फ्रेंचायझी कोणत्याही गावात किंवा कोणत्याही शहरात घेऊ शकता. फक्त त्या ठिकाणी आधीपासून पोस्ट ऑफिस ची सेवा नसावी. Business Idea
पोस्ट ऑफिसच्या सेवा देशभरातील प्रत्येक भागात पोहोचवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. देशातील अनेक भागांमध्ये पोस्ट ऑफिस नसल्यामुळे तेथील लोकांना पोस्ट ऑफिसच्या सेवांचा लाभ मिळत नाही. या फ्रंचाईजीमुळे पोस्ट ऑफिस सुविधा अधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर लोकांना रोजगाराचाही लाभ उपलब्ध होईल. या फ्रेंचायझी साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. Business Idea