Gold News : सोन्याच्या भावात प्रचंड घसरण! जळगावमध्ये ग्राहकांना दिलासा, सोनं तब्बल ७९०० रुपयांनी स्वस्त

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price News Jalgaon : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या उलथापालथीचा थेट परिणाम आता स्थानिक सराफा बाजारात दिसून येतो आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे, अमेरिका-चीन यांच्यातील ट्रेड डील, तसेच भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाची शक्यता कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातून माघार घेतली आहे. यामुळे एमसीएक्सवर सोने ५ आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले असून ऑल टाइम हाय म्हणजेच ९९,३५८ रुपयांवरून तब्बल ७९०० रुपयांनी घसरून ९१,४६१ रुपयांवर आले आहे. ही घसरण केवळ आकड्यांची नाही, तर सामान्य खरेदीदारांसाठी सोनं विकत घेण्याची सुवर्णसंधी आहे.Gold News

जळगावच्या बाजारात काय परिस्थिती आहे?

सोमवारी सकाळच्या सत्रातच जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात थेट २२६६ रुपयांची घट झाली आणि दर ९७,४३८ रुपयांवर आले. त्यानंतर सायंकाळी आणखी ८२४ रुपयांनी घसरण होऊन भाव ९६,६१४ रुपयांवर स्थिरावले. म्हणजेच फक्त एका दिवसातच ३०९० रुपयांची मोठी घसरण झाली होती. त्यानंतर थोडाफार चढ-उतार झाल्यानंतर आता पुन्हा दर घसरले आहेत.Gold Price News Jalgaon

गेल्या आठवड्याभरात सोनं ५ हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. याआधी १,०९७० रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठलेल्या दरांमुळे लोकांनी खरेदी थांबवली होती. मात्र आता तेच दर जीएसटीसह ९४,८०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे अनेकांसाठी ही खरेदीची योग्य वेळ ठरू शकते.

दर घसरण्याची कारणं काय?

अमेरिकेच्या महागाई दरात घट: एप्रिल महिन्यात अमेरिकेचा CPI म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक कमी झाला आहे. यामुळे फेडरल रिझर्व्ह पुढील बैठकीत व्याजदर कपात करेल, ही शक्यता कमी झाली आहे.

बॉन्ड यिल्ड वाढली: अमेरिकेच्या १० वर्षांच्या बॉन्ड यिल्डने ४.५०% चा टप्पा ओलांडला आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घटली आहे.

गुंतवणूकदारांची मुनाफावसुली: अनेक गुंतवणूकदारांनी सोने गगनाला भिडल्यानंतर नफा बुक केला आहे, ज्यामुळे भावात घसरण झाली.

पुढे काय अपेक्षित?

विशेषतः मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री आणि पृथ्वीफिनमार्टचे कमोडिटी रिसर्च प्रमुख मनोज कुमार जैन यांच्या मते, पुढील काही दिवस सोनं चढ-उतार करणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने:

सपोर्ट लेव्हल: $3130 – $3100 प्रति ट्रॉय औंस

रेजिस्टन्स: $3200 – $3220 प्रति ट्रॉय औंस

एमसीएक्स गोल्ड (भारतीय वायदा बाजार):

सपोर्ट लेव्हल: ₹91,350 – ₹90,780 प्रति 10 ग्रॅम

रेजिस्टन्स: ₹92,450 – ₹92,690 प्रति 10 ग्रॅम

ग्राहकांसाठी संदेश

सोनं सतत चढत गेलं तेव्हा अनेकांनी खरेदी टाळली होती. आता तेच सोने जवळपास ७९०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. जळगावसारख्या शहरांमध्ये ग्राहकांसाठी ही एक ‘आनंदसरी’ आहे. सण-समारंभाच्या हंगामात किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने हे दर अतिशय योग्य आहेत.

सोनं खरंच ‘न्यू करन्सी’ होत चाललंय. पण दराच्या या मोठ्या चढ-उतारांमध्ये योग्य वेळी खरेदी करणं म्हणजेच यशस्वी गुंतवणूक असते.

(सूचना: वरील दर आणि विश्लेषण ही बाजारातील घडामोडींवर आधारित आहेत. खरेदीपूर्वी स्थानिक सराफांशी दर पडताळा करून निर्णय घ्यावा.)

हे पण वाचा | स्वस्तात सोने खरेदी करायची सुवर्णसंधी! सोन्याचे नवीन दर ऐकून ग्राहकांची दुकानात गर्दी..

Leave a Comment