Farmer ID: शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्यासाठी महाराष्ट्र सह दशभरातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी ओळखपत्र हे अॅग्रीस्टॅक प्लॅटफॉर्मचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओळखपत्र असेल त्यांना इथून पुढे सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा | फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी ठरणार मोठ्या फायद्याची; याद्वारे मिळणारी 5 महत्त्वाचे मोफत फायदे
काय आहे शेतकरी ओळखपत्र?
शेतकरी ओळखपत्र ही शेतकऱ्यांची आधार कार्ड प्रमाणे ओळख पटवण्यासाठी अद्वितीय डिजिटल ओळखपत्र आहे. जी राज्य भूमी अभिलेख प्रणालीशी सक्रियपणे जोडलेली असेल. म्हणजेच शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदणी मध्ये बदल झाल्यावर शेतकरी ओळखपत्र आपोआप अपडेट होणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार इथून पुढे सर्व सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र असणे अतिशय आवश्यक आहे. Farmer ID
हे पण वाचा | पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची माहिती! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये…
भारत सरकारच्या डिजिटल कृषी अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या किसान आयडी, शेतकऱ्यांना मोठे फायदे देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. कृषी क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजना आणि सेवा शेतकऱ्यांना सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचा उद्देश शेतकरी ओळखपत्राचा आहे. तुम्ही या ठिकाणी शेतीसंबंधीतील सर्व तपशील तपासू शकता. शेतीशी संबंधित कामासाठी कर्ज प्रक्रिया याद्वारे अधिक सोपी होणार आहे. शेतकरी आयडी चा वापर शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राशिवाय किंवा बँकांना भेट न देता पीक कर्ज देण्यासाठी केला जाऊ शकतो. या आयडी द्वारे शेतकऱ्यांना कर्ज काही तासाच्या आत दिले जाऊ शकते.
हे पण वाचा | महाडीबीटी अंतर्गत सौरचलित फवारणी पंप मिळण्यास सुरुवात; तुम्हाला मॅसेज आला का नाही?
शेतकरी ओळखपत्रचे फायदे
- शेतकरी नोंदणी शेतकऱ्यांची पडताळणी पात्रता स्थापित करते.
- यामुळे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याची गरज भासणार नाही.
- शेतकरी नोंदणी मध्ये नोंदणी केल्यानंतर भविष्यात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल. जर तुम्ही ओळखपत्र काढले नाही तर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- शेतकरी नोंदणीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी चांगल्या वेगवेगळ्या योजना आखता येतील. मात्र जे शेतकरी ओळखपत्र काढणार नाहीत त्यांना मिळणाऱ्या लाभापसून वंचित राहावे लागेल.
- शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून बँकेकडून कर्ज घेण्यास मदत मिळू शकते. तसेच खते बियाणे कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान देखील मिळेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा