Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या जिल्ह्यातील पिक विमा वाटप सुरू…! कृषी मंत्र्यांची माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप सुरू झालेला आहे. यंदा राज्यामध्ये निसर्गाने शेतकऱ्यांना चांगलंच गंडवलं आहे. कधी पावसाचा मोठा खंड तर कधी अचानक आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे.

अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पिक विमा दिला जातो. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत यासाठी राज्य सरकारने काही जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.

खरंतर शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा रक्कम मिळालेली नाही. मध्यंतरी शेतकऱ्यांना काही जिल्ह्यांमध्ये 25% अग्रीम पिक विमा वाटप करण्यात आला होता. परंतु शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे.

आता शेतकऱ्यांना ही मदत कधी मिळते हे आता पाहण्यासारखे राहणार आहे. शासनाच्या माध्यमातून जवळपास 16 जिल्ह्यामध एकूण 1652 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहे असे प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त वायरल होत आहे.

शेतकऱ्यांना ही रक्कम मिळवण्यासाठी पिक विमा कंपन्याकडून आवश्यक अशी तयारी करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा भरपाई देण्याचा निर्णय सुरुवात केलेली आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे येत्या काळामध्ये शेती करण्यास मदत होणार आहे परंतु ज्या भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी देखील शासनाच्या माध्यमातून भरपाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

लवकर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. पंतप्रधान पिक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो व याचा मोठा दिलासा देखील शेतकऱ्यांना मिळतो. लवकर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे रक्कम वितरित करण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गांमधून होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!