Cotton Market | कापूस पीक प्रमुख्याने मराठवाडा विदर्भ खानदेशी या भागामध्ये घेतली जाते या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण याच पिकावर अवलंबून आहे. बऱ्याच दिवसापासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे.
पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस पिक कोडीमोल भावात शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दारात व्यापारी कापूस खरेदी करत आहेत. यामुळे शेतकरी मोठा अडचणीमध्ये सापडला आहे.
शेतीला केलेला खर्च निघत नसल्याने शेती कशी करायचा असा प्रश्न शेतकरी वर्ग म्हणून व्यक्त होत आहे. मध्यंतरी एक या शेतकऱ्यांनी संतप्त होऊन बाजार समितीमध्ये नेलेला कापूस पेटवून दिला. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कापूस भावाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसापासून वायदे बाजार भावामध्ये वाढ झाली पण बाजार समितीमध्ये भाव म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा भाव दाबावतच आहे.
पण पुढील काही दिवसांमध्ये बाजार समितीमधील भाव वाढतील कारण बाजार समितीमधील भाव वाढण्यासाठी दोन कारणांमुळे पोषक स्थिती निर्माण झाली आहे. मग तुम्ही म्हणाल हे तर आम्ही दोन महिन्यापासून ऐकत आलो की कापसाचे भाव वाढतील. मग आता असं वेगळं काय घडलं की यामुळे आम्हाला दिलासा मिळणार आहे. तर हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
या कारणामुळे कापसाचे दर वाढणार ?
शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार सर्वात पहिले कारण म्हणजे वायदे बाजार मध्ये कापसाची वाढ झालेली भाव आणि दुसरे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे वाढत चाललेले दर तिसरं कारण म्हणजे सर्वात मोठे आहे.
बाजारामध्ये अपेक्षित असावा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस घरामध्ये साठवून ठेवला आहे. याच कारणामुळे बाजारामध्ये अपेक्षित असा कापूस उपलब्ध होत नसल्याने बाजारामध्ये भाव वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
आता पांढरे सोने पुन्हा एकदा चमकणारा अशी स्थिती बाजार मध्ये निर्माण झाली आहे. आता याकडे पाहण्यासारखे राहणार आहे की शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य भाव मिळतो का येत्या काळामध्ये कापसाचे दर वाढणार का