कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बजेटमध्ये 5 वर्षांसाठी विशेष योजना जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton farmers News: देशातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या कमी उत्पादकता नैसर्गिक आपत्ती आणि कमी भावामुळे खूप अडचणी सापडले आहेत. देशातील कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पाच वर्षासाठी कापूस उत्पादकता मिशनची ( मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टव्हीटी) घोषणा केली आहे. यामधून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान पुरवल्या जाणार आहे. तसेच अतिरिक्त लांब धाग्याचे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना केली आहे.

👇👇👇👇

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत झालेल्या घोषणा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील कापूस उत्पादकता मागील काही वर्षापासून खूपच कमी झाले आहे. जगातील महत्त्वाच्या अमेरिका ब्राझील ऑस्ट्रेलिया युक्त या देशांमध्ये कापूस उत्पादन सरासरीपेक्षा कमी आहे. त्याचबरोबर भारतातील कापूस उत्पादकता त्यापेक्षा खूपच कमी झाली आहे. या देशातील शेतकऱ्यांना तेथील सरकार नवीन बियाणे आणि तंत्रज्ञान पुरवते त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे उत्पादन भारतापेक्षा जास्त आहे.

या देशातील शेतकरी हेक्टरी उत्पादकता भारतापेक्षा चार पटीने जास्त करत आहेत. उत्पादकता कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउताराचा फटका भारतातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतो. देशातील कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी सरकार आता प्रयत्न करत आहे. मागील अनेक दिवसापासून अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने नाही तर उद्योग कडून देखील करण्यात येत होती. Cotton farmers News

👇👇👇👇

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत झालेल्या घोषणा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतात अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन खूपच कमी प्रमाणात होते. त्यामुळे अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसासाठी भारताला आयातीवर अवलंबून राहावे लागते. भारत दरवर्षी जवळपास 10 ते 12 लाख गाठी या कापसाच्या आयात करत असतो. भारताला कापूस उत्पादक देश म्हणतात मात्र तरीदेखील अमेरिका ऑस्ट्रेलिया तसेच इतर देशाकडून कापूस आयात करावा लागतो. आपल्या देशाला इतर कोणत्याही देशाकडून कापूस आयात करायची गरज भासू नये त्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

भारतातील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून देशातच अतिरिक्त लांब धाग्याची बियाणे आणि तंत्रज्ञान पुरवण्याची मागणी करत आहे. देशातच या कापसाचे उत्पादन झाल्यास इतर देशाकडून आयात करण्याची गरज भासणार नाही. अर्थमंत्र्यांनी आता अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे वाण शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना या कापसाच्या उत्पादनातून चांगला भाव मिळेल आणि उत्पादन देखील वाढेल आणि इतर देशांतील आयात देखील कमी होईल.

👇👇👇👇

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत झालेल्या घोषणा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय?

कापूस उत्पादकता मिशन पाच वर्षासाठी असेल. या मिशनमध्ये कापसाचे उत्पादकता वाढीवर केंद्र सरकार लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच शाश्वत कापूस उत्पादनासाठी काम केले जाणार आहे. तसेच अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे वाण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्या संबंधित उत्पादकांना तंत्रज्ञान पुरवले जाणार आहे. कापूस उद्योगासाठी 5 एफ धोरण राबवले जाणार आहे. या धोरणाच्या माध्यमातून देशातील कापड उद्योगाला गुणवत्तापूर्ण कापसाची सुरळीत पुरवठा करण्यावर जोर दिला जाणार आहे.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment