Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2025 26 सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात चढ झाला का उतार याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र बजेट सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात काही प्रमाणात स्थिरता दिसून येत आहे. आज रविवार असल्यामुळे देशभरातील सराफ बाजार बंद आहेत त्यामुळे कालचे दर आज लागू केले जातात. काल सराफ बाजार बंद होण्यावेळी सोन्याचे दर किती होती हे आपण आज जाणून घेणार आहोत.
बजेटमध्ये सोन्याबाबत काय निर्णय झाला
केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्क 25% वरून 20% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोन्याच्या उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आणि ग्राहकांसाठी दागिने किंचित स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्लॅटिनम फाइंडिंग वरील आयात शुल्क पाच टक्के करण्यात आले असून एक पॉईंट चार टक्के एआयडीसी (कृषी अवसंरचना आणि विकास उपकरण) लागू करण्यात आली आहे. यामुळे लक्झरी ज्वेलरी उद्योगाला चालना मिळेल आणि स्थानिक बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे. आज रविवार असल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही पण उद्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर वाढतील का घसरतील हे पाहण्यासारखे राहणार आहे.
सोने चांदीचे दर
24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 82086 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 23 कॅरेट सोन्याची किंमत 81757 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 191 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 565 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 14 कॅरेट सोन्याची किंमत 48 हजार वीस रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 93 हजार 533 रुपये प्रति किलो एवढी आहे. Gold Price Today
शहरानुसार सोन्याचे दर.
शहर | 22 कॅरेट सोन्याचे दर | 24 कॅरेट सोन्याचे दर | 18 कॅरेट सोन्याचे दर |
मुंबई | 77,300 | 84,330 | 63,250 |
दिल्ली | 77,450 | 84,480 | 63,370 |
कोलकत्ता | 77,300 | 84,330 | 63,250 |
चेन्नई | 77,300 | 84,330 | 63,850 |
अहमदाबाद | 77,350 | 84,380 | 63,290 |
जयपुर | 77,450 | 84,480 | 63,370 |
पुणे | 77,300 | 84,330 | 63,250 |
नाशिक | 77,350 | 84,380 | 63,290 |
सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?
सोने खरेदी करताना त्याचे शुद्धता कशी ओळखावी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक सोन्याची शुद्धता त्याच्या हॉलमार्क वर असते. जर तुम्ही 24 कॅरेट सोने खरेदी करणार तर ते सोने 99.9% शुद्ध आहे आणि त्यावर 999 असा हॉलमार्क असेल. 22 कॅरेट सोन्यावर 916 असा हॉलमार्क असेल हे सोने 91.6% शुद्ध असते. 18 कॅरेट सोने 75 टक्के सुद्धा असते व त्याच्यावर 750 असा हॉलमार्क असतो. 14 कॅरेट सोने 58.5% सुद्धा असते व त्यावर 585 असा हॉलमार्क असतो.
भविष्यात सोने-चांदीचे दर कसे राहणार?
सोने चांदीचे दर जागतिक बाजारावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या घडामोडीमुळे सोन्याचे दर निश्चित केले जातात. जागतिक बाजारात सोने प्रति औंस 2835 डॉलर वरती स्थिर आहेत. मागील एक महिन्यात भारतीय बाजारात सोन्याचे दर सात टक्के म्हणजे 5510 रुपयांनी वाढले आहे. भविष्यात सोने-चांदीची मागणी वाढल्यास दरामध्ये आणखीन वाढ होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. बजेट 2025 च्या सरकारच्या निर्णयामुळे सोन्याचे दर काही प्रमाणात नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. मात्र सोने-चांदीचे दर जागतिक घडामोडीवर अवलंबून असल्यामुळे भविष्यात यात मोठी वाढ होऊ शकते.