Thursday

13-03-2025 Vol 19

शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी 50 लाख रुपये पर्यंत मिळवा कर्ज, अशा पद्धतीने करा अर्ज | Business Loan Apply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Loan Apply : मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे आज काल तुम्हाला तर माहित आहे नोकरी करणे किती अवघड आहे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. अशातच एक पर्याय उरतो तो म्हणजे व्यवसाय करणे व्यवसाय करायचं म्हणजे त्यासाठी भांडवल आवश्यक आहे. हे भांडवल तुम्ही कशा प्रकारे उभा करू शकता. आज आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

शेती व शेती निगडित असणारे जोडधंद्यांच्या खूप पूर्वीचे नाते आहे शेती सोबत पशुपालन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. व यामध्ये गाय म्हशी पालन दूध उत्पादन दृष्टिकोनातून केली जाते पशुपालन सोबतच कुकुट पालन शेळीपालन, व्रहपालन अशा अनेक व्यवसाय आता पुढे येत आहेत.

आपण शेळी पालन या व्यवसायाचा जर विचार केला तर कमी खर्चात आणि कमीत कमी जागेमध्ये करता येणार हा व्यवसाय लोकप्रिय व अनेक तरुण सुशिक्षित वर्ग आता शेळीपालन या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळेला दिसून येत आहे. शेळीपालन हा व्यवसाय आता व्यवसायिक दृष्टिकोनातून केला जात आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा केला जात आहे या व्यवसायाला आता खूप चांगले दिवस आलेले आहेत.

शेळी पालन या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासन माध्यमातून मिळणाऱ्या योजनेचे पाठबळ तर मिळतेच परंतु बँकेकडून देखील कर्ज दिले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या स्वरूप आणि गरजेनुसार बँकेकडून कर्ज घेऊ शकतात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही घेतलेल्या कर्जाचे व्याजावर शासनाकडून अनुदान सुद्धा देण्यात येत आहे शेळीपालनकरिता नेमकं कशा पद्धतीने कर्ज उपलब्ध होते या संबंधित आपण आज माहिती बघणार आहोत.

नाबार्डच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध

शेतकऱ्यांना शेळी पालन करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून शेळीपालन करिता कर्ज देण्यात येते व देण्यात येतो शेळी पालन करिता अनुसूचित जाती/ जमाती आणि BPL प्रवागातील लोकांना 50 टक्के सबसिडी मिळते व इतर प्रयोगातील नागरिकांना 40 टक्के पर्यंत सबसिडीचा लाभ दिला जातो नाबार्डाच्या माध्यमातून जास्तीत जास्त 50 लाख रुपयांचे अनुदान याकरिता निश्चित करण्यात आलेली आहे.

नाबार्ड योजनेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते.

या योजनेमध्ये अनेक बँकांचा समावेश आहे हा नाबार्ड योजनेअंतर्गत येतो व या माध्यमातून शेळीपालनाला प्रोत्साहन देण्याकरिता बँक कर्ज उपलब्ध करून देतात बँकांकडून कर्ज घेऊन तुम्ही शेळीपालना मधून मिळणारे अनुदानाचा लाभ सहजपणे घेऊ शकतात नाबार्ड योजना अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँक तसेच नागरी बँक, ग्रामीण विकास बँक आणि राज्य सहकारी कृषी इत्यादी माध्यमातून तुम्हाला शेळीपालन करण्यासाठी कर्ज मिळते.

शेळ्यांची खरेदी व त्यांच्या आहारासाठी लागणारा चारा आणि खाद्य तसेच शाळेच्या निवारांकरिता लागणारे शेड बांधण्यासाठी तुम्हाला कर्ज देखील मिळत आहे.

बँक कोणत्या प्रकारचे कर्ज देतात

बँकाच्या माध्यमातून शेळी पालन करिता दोन प्रकारचे कर्ज दिले होते यातील पहिला प्रकार म्हणजे शेळी पालन व्यवसाय दुसरे म्हणजे शेळीपालन व्यवसायाकरिता आवश्यक खेळते भांडवल जे शेळीपालन व्यवसायासाठी महत्त्वाचे असते त्याकरिता सुद्धा कर्ज मिळते.

तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कर्जाची गरज आहे त्यानुसार तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता शेळी पालन करण्याकरिता वेगवेगळ्या बँकेच्या निकषानुसार ग्राहकांना विहित नियमानुसार ठराविक रकमेचे कर्ज देतात.

शेळीपालन करिता कर्ज घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचे चार फोटो
  • मागील सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट
  • तसेच पत्त्याचा पुरावा असणे गरजेचे
  • उत्पन्नाचा दाखला,
  • आधार कार्ड
  • बीपील कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आदिवासी प्रमाणपत्र
  • शेळीपालन व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जमीन नोंदणी दस्तावेज
  • वर दिलेले आवश्यक कागदपत्रे कर्ज घेण्यासाठी गरजेचे आहे.

या योजने करिता तुम्ही कुठे अर्ज करू शकता ?

शेळीपालनिया योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत किंवा ब्लॉक ऑफिस मध्ये जाऊन अर्ज घ्यावा लागतो व तो भरून तुम्हाला विचारलेल्या सर्व माहिती व्यवस्थित नमूद करावे लागतील.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *