Beneficiary Status: केंद्र सरकार अंतर्गत चालवली जाणारी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हप्ते जमा करण्यात आले आहेत. यानंतर शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे प्रतीक्षा लागले आहे. दरम्यान या योजनेचा 19 वा हप्ता लवकरच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याची तारीख आणि किती पैसे मिळणार याबद्दल माहिती समोर आली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा होणार आहेत. येत्या 24 फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारच्या भागलपूर इथून एका कार्यक्रमात शेतकरी सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत. या दिवसापासून देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 19 व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेअंतर्गत देशातील 13 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.
या लाडक्या बहिणींचे खटाखट पैसे येणे बंद होणार! लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम लागू..
मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रामध्ये जाऊन शेतकरी नोंदणी केली नाही त्यांना हा हप्ता मिळू शकणार नाही. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळील सीएससी केंद्रात जाऊन आपली शेतकरी नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. हा हप्ता जमा होण्यासाठी आणखीन एक आठवडा बाकी आहे तोपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांनी आपली शेतकरी नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे. यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक देणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची केवायसी आणि शेतकरी नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार आहे.
पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी कशी पहावी?
तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे का नाही यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी तपासू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी यादी कशी पहावी? तर याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Beneficiary Status
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट! महिलांना दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार, जाणून घ्या सविस्तर..
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्या ठिकाणी बेनिफेसरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करून, या ठिकाणी तुमचा विभाग जिल्हा तालुका गाव निवडून लाभार्थी यादी तुमचे नाव तपासावी लागेल. या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता दिला जाणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा