नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानासाठी केवळ 1850 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेमध्ये केली होती. विरोधी पक्ष नेत्या सोबतच सत्ताधारी पक्षांनी देखील शेतकऱ्याच्या प्रश्नावर प्रस्ताव मांडले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हेक्टर क्षेत्रासाठी 15 हजार ऐवजी 20 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. Agricultural loan in india
राज्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. यावर्षी शेतकऱ्याने लागवड केली तेव्हा ऑगस्ट महिन्यात पाऊस उशिरा आल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस गारपीट अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज शेतकरी भरू शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना पोर्टल सुरू करून सहा हजार पाचशे कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संकटात सापडलेला शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देणार असल्याचे यावेळी ते म्हंटले.
हे पण वाचा:- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी..! कांद्याच्या भावात झाला मोठा बदल, पहा आजचा बाजार भाव
Agricultural loan in india
त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना एक रुपया पिक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या 177 टक्के वाढ झाली आहे. पिक विमा योजनेत विक्रमी एक कोटी 70 लाख शेतकरी सहभाग झाले आहेत. यासाठी राज्य सरकारने 5174 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या 2121 कोटी रुपयांची रक्कम विमा कंपनीने आगाऊ रक्कम म्हणून मंजूर केली आहे. 1217 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माझी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री म्हणाले आम्ही धरणावर जाऊन पाणी करतो. आम्ही घरी बसून फेसबुक लाईव्ह करत नाही अशी दोन जाती का त्यांनी केली.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक पंचनामा तयार करण्यात येत आहे. 32 जिल्हे पैकी 26 जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झाले असून परभणी, अकोला, नागपूर, अमरावती, गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्याचे पंचनामे अद्याप प्रलंबित आहेत.
आतापर्यंत नऊ लाख 75 हजार सात हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी तुम्हाला 2000 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. पंचनामा होताच डीबीटी द्वारे मदत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केले जाईल.
हे पण वाचा:- सोने झाले स्वस्त, आजची किंमत जाणून तुम्हाला आनंद होईल भविष्यात आणखीन स्वस्त होण्याची शक्यता