Friday

14-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारकडून भेट, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी पासून दिलासा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver : सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनेची माहिती दिली. दीड वर्षांमध्ये 44 हजार 278 कोटी विक्री मदत केली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अवकाळी पाऊस गारपीट आणि बळीराजाच्या समस्या संदर्भात विधानसभेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणती घोषणा केली ? जाणून घ्या

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना अठरा हजार 7 62 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. मात्र सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख 65 हजार शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहे. सालापासून हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी सभागृहात केली आहे.

नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 14 लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5 हजार 190 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यासोबतच धानासाठी 2022-23 मध्ये हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्यात आला होता. त्याचा लाभ चार लाख 80 हजार धान उत्पादकांना मिळाला होता. यंदाच्या वर्षी हा बोनस वाढवून शेतकरी वीस हजार रुपये करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा

शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यासाठी जुलै 2022 पासून म्हणजे गेल्या फक्त 18 महिन्यात शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत त्यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून 15000 चाळीस कोटी रुपये, सहकार 5 हजार 190 कोटी, पणन 5 हजार 114 कोटी, अन्न व नागरी पुरवठा 3 हजार 800 कोटी पशुसंवर्धन 243 कोटी अशा रीतीन तब्बल 44 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करीत असल्याचा शिंदे म्हणाले.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *