Cotton Market | राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बरेच दिवसापासून कापसाचे दर दबावत होते परंतु मध्यंतरी बाजारामध्ये आवक कमी झाल्याने कापसाच्या भावामध्ये सुधारणा झालेली आहे.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला देखील कापसाचे बाजारात दर खूपच कमी होते. यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. सरकारने जाहीर केलेल्या हमीदरापेक्षा देखील कमी भावामध्ये शेतकऱ्यांना कापूस विकावा लागल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून खंत व्यक्त होत आहे.
परंतु सध्याची स्थिती पाहता कापूस दरामध्ये काहीशी प्रमाणामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडे कापूस उरला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होणार नाही उर्वरित किंचित शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
या बाजार समितीमध्ये मिळत आहे सर्वाधिक दर
बऱ्याच दिवसापासून कापसाचे भाव दबावत होते परंतु राज्यातील परभणी बाजार समितीमध्ये कापसाला 7850 रुपये एवढा दर मिळाला आहे. तर सरासरीच्या दराचा विचार केला असल्यास 7750 रुपये प्रति क्विंटर एवढा दर मिळालेला आहे. त्यामुळे येथे बाजारांमधील कापसाची आवक 1275 क्विंटल एवढी झाली आहे.
तसेच राज्यातील वरोरा खांडबा बाजार समितीमध्ये 7600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. तसेच सरासरी साधारण सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. तसेच इथे बाजार समितीमध्ये 336 क्विंटल एवढी आवक झालेली आहे.
तसेच अकोला बोरगाव मंजू बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. व तसेच 54 क्विंटल कापसाची आवक झालेली आहे.
तसेच मानवत बाजार समितीमध्ये कापसाला 7775 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहेत तसेच इथे तीन हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे.