Weather Update: नमस्कार मित्रांनो उत्तरेकडील राज्यामध्ये येत्या 11 ते 14 मार्चपर्यंत पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र पश्चिम वाऱ्याचा कोणताही परिणाम होणार नसून पाऊस आणि गारपीटीची शक्यता नाही. तर पहा कोणत्या ठिकाणी पडणार अवकाळी पाऊस याबद्दल सविस्तर माहिती.
देशातील हवामान बद्दलचे चक्र कायम असून एकाच वेळी ऊन पाऊस आणि थंडी पाहायला मिळत आहे. इन हिवाळ्यात अवकाळी पावसाचे तांडव पाहायला मिळत आहे. आता उन्हाळा सुरू झाला असताना अधून मधून थंडी तर अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये येत्या 11 ते 14 मार्च दरम्यान पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी बर्फ वृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. वायव्य सीमेवर प्रवेश करणारे पश्चिम वाऱ्याचे झोत प्रामुख्याने उत्तर अरबी समुद्राकडे येत आहे. यामुळे पुढील चार दिवस उत्तरेकडील राज्यात अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये दहा ते बारा मार्च या कालावधीत उत्तराखंड या राज्यात हलक्या पावसा सोबत बर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील आहे.
12 आणि 13 मार्चला पंजाब मध्ये तर 13 मार्चला हरियाणा राजस्थान दिल्ली सह पश्चिम उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर या चार दिवसाच्या कालावधीमध्ये जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बलुचिस्तान मुझाफराबड हिमाचल प्रदेश या राज्यात देखील पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्र राज्यात मात्र पश्चिम वाऱ्याचा कोणत्याही परिणाम होणार नसून पाऊस आणि गारपीटीची शक्यता नाही असे हवामान खात्याने सांगितले आहे. मात्र उत्तरेकडील राज्यात ती परिस्थिती असल्यामुळे पहाटे गारवा दाटू शकतो असेही हवामान खात्याने म्हटले आहे. Weather Update
हे पण वाचा:- कापसाच्या दरात मोठी झेप, 1500 रुपये प्रति क्विंटलची वाढ..! जिनिंगच्या क्षमतेत देखील वाढ
One thought on “Weather Update: उद्यापासून पुन्हा होणारा अवकाळी पाऊस..! पहा कोठे पडणार?”