Maharashtra Weather Update : मे महिन्याच्या मध्यातच उष्णतेचा कहर अनुभवत असताना आता महाराष्ट्राच्या अनेक भागांत अवकाळी पावसाचा धडाका बसू लागला आहे. मागील २४ तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसानं झोडपलं असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. एवढंच नाही, तर मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरातही सकाळपासूनच हलक्याफुलक्या सरींचं आगमन झालं आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यभरात हवामानात प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे.Maharashtra Weather Update
या जिल्ह्यांना इशारा!
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी येत्या ४८ तासांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या भागांत वाऱ्याचा वेग ५० ते ६० किमी प्रतितास इतका प्रचंड असणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आणि सामान्य नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.Maharashtra Weather Update
हे पण वाचा | Maharashtra Weather Alert: आज या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनो सावध राहा!
मराठवाड्यात काही भागांत वादळं आणि पावसाच्या तडाख्यामुळे शेतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. विजांच्या गडगडाटासह जोरदार सरी आणि आकाशात वीजांचा खेळ दिसून येतोय. याच दरम्यान, मुंबईसह उपनगरातही सकाळपासूनच पावसाने हलकी हजेरी लावली आहे. ठाण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल, पण पुढचे तीन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत राहील असं संकेत देण्यात आलं आहे.
कामाशिवाय घराबाहेर पडू नका, छत्री सोबत ठेवा, असं हवामान विभागाचं आवाहन आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण, विजा, वाऱ्याचा जोर, तापमानात बदल आणि आद्रता यामुळे नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. मुंबईत आज कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान २९ अंश सेल्सिअस इतकं असणार असून, वाऱ्यांचा वेग २० ते ३० किमी प्रतितास असेल. पालघरमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या प्रगतीबाबत हवामान तज्ज्ञ डॉक्टर सुप्रीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारचे हवामानीय बदल सुरु आहेत. ईशान्य आसाम आणि परिसरात चक्रवाती प्रणाली, दक्षिण गुजरात व उत्तर कर्नाटकात वरच्या स्तरावर चक्रवात, बंगालच्या खाडीत दोन स्वतंत्र प्रणाली, तसेच ट्रफ रेषा तयार झाल्यामुळे देशभरात पावसाची शक्यता वाढली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही जाणवतो आहे.
विकेंडला पावसाचा जोर अधिक असणार असून, उष्णतेची जागा पावसाने घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तयारी ठेवावी. प्रवास करताना खबरदारी घ्यावी. विजांच्या गडगडाटात मोबाईल, वायरिंग यापासून दूर राहावं. शक्यतो घरातच थांबावं.
Disclaimer : शेतकऱ्यांनो, वरील दिलेला हवामान अंदाज हा, भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार आहे. यामध्ये कुठलाही बदल झाल्यास योग्य हवामान अंदाज तपासून.