22-24 Carat Gold Rates : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे. जानेवारी दरम्यान या मौल्यवान धातूंनी स्थिरता दाखवली. काही काळात किमतीमध्ये घट पाहायला मिळाली होती. मात्र आता पुन्हा तेजी आलेली आहे. सनसुदीच्या काळात अशा वाढीचे चित्र नेहमी दिसून येते, पण नंतर झालेली घसरण आता भरून निघालेली आहे. 22-24 Carat Gold Rates
सोन्याची किमतीची स्थिती
- मागील दोन आठवड्यामध्ये सोन्याच्या दारामध्ये मोठी वाढ या आठवड्यात सोमवारी सोने प्रति दहा ग्रॅम 420 रुपयांनी महाग झालेले आहे. 14 जानेवारी रोजी किंमत 110 रुपयांनी घसरल्या, तर 15 जानेवारी 110 रुपयांनी पुन्हा वाढल्या. गुड रिटर्न्स वर दिलेल्या माहितीनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर सध्या 73,550 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 80,220 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झालेला आहे.
चांदीच्या दरातील चढ-उतार
- खर तर गेल्या काही दिवसांपासून, चांदीच्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहे याच आठवड्याच्या सोमवारी चांदीची दर 1,000 रुपयांनी वाढले होते. मात्र, 14 जानेवारीला 2,000 रुपयांची घट झालेली आहे. 15 जानेवारीला पुन्हा 1,000 रुपयाने किमती कमी झालेल्या आहे. तर सध्या एक किलो चांदीचा दर 93,500 रुपये इतका आहे.
वेगवेगळ्या शुद्ध सोन्याचे दर
- इंडियन बुलियन अँड ज्वेलर ओसिएशनच्या माहितीनुसार आज सोन्याचा दर खालील प्रमाणे आहे.
- 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम : 78,424 रुपये
- 23 कॅरेट प्रति दहा ग्रॅम : 78,110 रूपये
- 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम : 71,836 रुपये
- 18 कॅरेट प्रती 10 ग्रॅम : 58,810 रूपये
- 14 कॅरेट प्रती 10 ग्रॅम : 45,878 रुपये
वायदे बाजार आणि सराफ बाजारातील दरातील फरक
- वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरावरती कोणताही शुल्क लागू होत नाही. मात्र, सराफ बाजारामध्ये शुल्क आणि कर दोन्ही लागू होतो, त्यामुळे दरामध्ये फरक आढळतो. सोन्या- चांदीच्या खरेदीसाठी जाणीवपूर्वक ज्या किमतीची माहिती करून घ्या आणि बाजारानुसार स्थितीनुसार खरेदीचा निर्णय घ्या.