Weather Today India | शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. वायु भारताला ताज्या वेस्टन्र डिस्टर्बोन्सच्या सामना करावा लागेल. याच कारणामुळे भारतातील काही भागात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
भारतीय विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली सकाळच्या वेदात धुके अत्यंत दाट धुके दिसण्याची शक्यता आहे. तसेच या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातही काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह अनेक भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, वायव्य भारतात नव्या सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्स वायव्य भारतावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय हवामान विभाग आणि त्यांचे अंदाजामध्ये असे म्हटले आहे की काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर काही भागात गारठा जाणवेल. तसेच हरियाणा दिल्ली पंजाब आणि राजस्थान मध्ये आज आणि उद्या हलकी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशातही आज पाऊस हजेरी लावणार आहे. तमिळनाडू आणि केरळच्या काही भागात मुसळधार पाऊस हजेरी लावेल.