Friday

14-03-2025 Vol 19

येत्या 48 तासात महाराष्ट्रात थंडीची लाट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather forecast : राजधानी दिल्ली सह, जवळपास सर्वच शहरांवर कमी अधिक प्रमाणावर धुक्यांची लाट पसरली आहे. सगळीकडे थंडीची लाट आली असुन, हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन दिवस अशीच धुक्यांची चादर कायम राहील‌. आणि थंडीची ही लाट देखील कायम राहणार, असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

थंडी आणि धुक्यांची तीव्रता जास्त असणाऱ्या ठिकाणी, शाळेच्या वेळामध्ये देखील बदल करण्यात आले आहे. गाझियाबाद, मथुरा, अलीगड यांसारख्या ठिकाणी थंडी व धुक्याच्या लाटेचा तीव्र इशारा देण्यात आल्याने, शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा पुढील 48 तासात राज्यात थंडीची लाट, येण्याची शक्यता वर्तवली आहे. यात, प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यावर अधिक परिणाम जाणवणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्याची काही शहरे गाठण्याची शक्यता आहे.

पुण्यासहं, पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा प्रभाव वाढणार असून, राजधानी मुंबईत गुलाबी थंडी पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने होत‌, असणाऱ्या बदलावामुळे कधी थंडी तर मध्येच कधी आभाळ येऊन थंडीचे तीव्रता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

विदर्भात अनेक शहरांमध्ये तापमान 10 अंशसेल्सिअस पेक्षा कमी झाले होते. तर महाराष्ट्रातील उर्वरित शहरांमध्ये तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या आसपास होता. मागील चार दिवसांपासून धुक्यांची चादर सगळीकडे पसरली आहे. तर, मध्येच गर्मी जाणवत आहे. मात्र, हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *