Toyota New Car : सध्या आपण पाहिलं तर मार्केटमध्ये आपल्याला अनेक इलेक्ट्रिकल कार पाहायला भेटत आहेत. आणि सध्या सगळीकडेच इलेक्ट्रिक कारचं वारे वाहत आहे, पण याचवेळी जपानची जबरदस्त कार कंपनी Toyota एक तगडी Hybrid कार भारतात आणण्याच्या तयारीत आहे. या कार च नाव आहे Toyota Aqua Hybrid आणि तिचा खास वैशिष्ट्य म्हणजे पेट्रोलवर 35 किमी प्रति लिटर अफाट मायलेज! हे ऐकून तुमचे डोळे फिरले ना भाऊ? पण थांबा अजून भन्नाट माहिती तर अजून बाकी आहे त्यासाठी हा लेख खालील सविस्तर वाचा. Toyota New Car
शिकार आधीपासूनच जपानमध्ये धावत आहे आणि धुमाकूळ घालत आहे. आता नवी दिल्लीच्या रस्त्यांवर तिची चाचणी सुरू झाली आहे. त्यामुळे ही कार भारतात लवकरच दाखल होणार, यामध्ये काही शंका नाही. तिची डिझाईन लांबी 4,050 मिमी, रुंदी 1,615 मिमी उंची 1,505 मिमी, व्हिलबेस 2,600 मिमी ही गाडी TNGA – B प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार असल्याची शक्यता आहे.
Toyota Aqua Hybrid ही कार Hybrid Powertrain म्हणजे पेट्रोल +बॅटरीच्या जोरावर चालणार आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार तब्बल 35.8kmpl मायलेज देईल! यामध्ये 1.5 लिटर, 3 सिलेंडरच दमदार इंजिन असेल जे 89 BHP आणि 120 NM टॉर्क जनरेट करेल. इंजिन E-CVT गिअर बॉक्स सहज जोडलेला असेल.
या कार मध्ये बायपोलर निकेल मेटल हाय ब्राईड बॅटरी दिली जाणार आहे. ही बॅटरी सामान्य बॅटरी पेक्षा जास्त आऊटपुट देईल आणि कमी जागा घेईल, त्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव झकास मिळणार.
या कारमध्ये काही जबरदस फिचर्स देण्यात आलेले आहेत. कृत्रिम लेदर सीट्स, पॉवर आमरस्ट, टिशू बॉक्ससाठी खास जागा, चार्जिंग केबलसाठी स्लाइडिंग ट्रे, 7 ते 10.5 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले,सगळंच प्रीमियम आणि आरामदायक. जपानमध्ये या कारची किंमत 11.6 लाख ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. जर भारतात ही कार लाँच झाली, तर Maruti Wagon R पासून ते 120 पर्यंतच्या गाड्यांना चांगली टक्कर मिळेल.
हे पण वाचा | Maruti Swift : स्विफ्ट गाडी खरेदी करा. जीएसटी साठी एकही रुपया लागणार नाही. फक्त 5 लाखात मिळेल कार,