Solar Panel Scheme | राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन योजनेअंतर्गत नागरिकांना घरावरचे सोलर पॅनल मिळणार आहे. या योजनेचे नाव सूर्योदय योजना असे ठेवण्यात आले आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आता या योजनेअंतर्गत राज्यातील दोन लाख नागरिकांना घरावरचे सोलर पॅनल मिळणार आहे.
केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात येणाऱ्या सूर्योदय योजनेअंतर्गत राज्यातील पावणेदोन लाख घरामध्ये आता ऊर्जा प्रकल्प कार्यरत होणार आहे. यासाठी राज्यातील सात जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी या योजनेअंतर्गत पंचवीस हजार नागरिकांना येत्या 31 मार्चपर्यंत सोलर पॅनल मिळणार आहेत. आता हे आव्हान पूर्ण करण्याचे मोठे काम महावितरण पुढे असणार आहे.
या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार सोलार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या सूर्योदय योजनेअंतर्गत पुणे नाशिक लातूर नांदेड नागपूर छत्रपती संभाजी नगर आणि अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी 25 हजारांचे लक्ष देण्यात आलेले आहे. हे लक्ष 31 मार्च पर्यंत पूर्ण करावे असे आदेश महावितरण ला देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे दुर्गम भागातील घरावर वीज पोहोचवावी आणि विज देखाचा भार कमी होण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबवण्यात येत आहे.