स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI PO Requirement 2025 : नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेले आहे. तुम्ही देखील एखाद्या बँकेमध्ये नोकरी शोधत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया ने एक मोठी भरती जाहीर केलेली आहे. यामध्ये अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, पात्रता याची सविस्तर तपशील खालील प्रमाणे असणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) 2025 या वर्षासाठी प्रोबेसनरी ऑफिसर ( PO ) पद भरती जाहीर केलेली आहे. या भरती अंतर्गत 600 रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी एक मोठी संधी निर्माण झालेली आहे. या भरती संबंधित सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे. SBI PO Requirement 2025

या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख

  • ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025

परीक्षा तारीख

  • परीक्षेची तारीख 8 मार्च आणि 15 मार्च 2025 दरम्यान
  • मुख्य परीक्षेची तारीख पुढील तपशील SBI अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे.

भरती प्रक्रिया

स्टेट बँक ऑफ अंतर्गत SBI PO 2025 साठी मोठी भरती करण्यात येणार आहे याची निवड तीन टप्प्यात होणार आहे.

  • प्राथमिक परीक्षा : एकूण गुण :100
  • विषय : इंग्रजी, परिणात्मक योग्यता, तर्कशक्ती क्षमता,
  • कालावधी : एक तास
  • मुख्य परीक्षा- वस्तुनिष्ठ चाचणी : 200 गुण
  • तर्क आणि संगणक योग्यता
  • डेटा विश्लेषण आणि व्याख्या
  • बँकिंग ज्ञान/अर्थव्यवस्था/सामान्य जागरूकता
  • इंग्रजी भाषा
  • वर्णनात्मक चाचणी इंग्रजी प्रवीणतेसाठी 50 गुण
  • सायकोमॅट्रिक चाचणी / मुलाखत
  • सायकोमॅट्रिक चाचणी , गट व्यायाम, ( 20 गुण आणि मुलाखत 30 गुण )

अर्ज शुल्क ( Application fee )

  • General/ OBC/ EWS: ₹750
  • SC/ST/PWPD : परीक्षा शुल्क नाही

वयोमर्यादा

  • या भरतीसाठी किमान वय 21 वर्ष ते कमाल वय 30 वर्ष ( 1 एप्रिल 2025 पर्यंत)
  • राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादित सवलत शासकीय नियमानुसार लागू

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवारी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी
  • अंतिम वर्ष सीमेस्टर चे विद्यार्थी अर्ज करू शकतात परंतु त्यांना 31 डिसेंबर 2024 पूर्वी पदवी मिळाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

इथे करा अर्ज

जर तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरती https://sbi.co.in भेट देऊन अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी SBI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment