Thursday

13-03-2025 Vol 19

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! एसबीआय बँकेने ग्राहकांना दिला महत्त्वाचा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank News : भारतातील सर्वात मोठी नामांकित आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा दिलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे फेक मेसेजेस वायरल करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे समोर आलेले आहे. SBI Bank News

सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने ( PIB) ग्राहकांना एक नव्या सायबर फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांना एसबीआय रिवार्डच्या नावाच्या बनावट्यापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. या फसवणुकीत ग्राहकांना बनावट ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले जाते, त्या माध्यमातून त्यांची बँक खाते रिकामी होण्याचा धोका असतो.

SBI रीवर्ड पॉईंट घोटाळा काय आहे?

या फसवणुकीमध्ये सायबर गुन्हेगार ग्राहकांना बनावट मेसेज पाठवत आहेत. या मेसेजमध्ये दावा केला जातो की ग्राहकांचे एसबीआय नेट बँकिंग रिवार्ड पॉईंट लवकरात लवकर संपणार आहेत. तसेच यासोबत एक लिंक देखील दिली जाते. ग्राहकांना या लिंक वर क्लिक केल्यास SBI रिवार्ड्स नावाचे ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. हे आपण सह SBI REWARDS 27.APK अशा नावाने आहे.

APK फाईल म्हणजे काय?

एपीके म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट, जी एंड्रॉयड स्मार्टफोन ॲप इन्स्टॉल करण्यास वापरले जातात. सुरक्षित अँप बहुदा google play store वरूनच डाउनलोड करावे. मात्र तृतीय पक्ष स्त्रोता मधून डाऊनलोड केलेले एपीके फाईल मध्ये व्हायरस किंवा मालवेअर असण्याची शक्यता असते. या मदतीने सायबर गुन्हेगार तुमचा फोन हॅक करण्याची शक्यता आहे.

कशाप्रकारे केली जाती फसवणूक ?

  • यामध्ये फसवणूक करणाऱ्या ग्राहकांना बनावट एपीके फाईल डाऊनलोड करण्यास आम्हीच दाखवले जाते ग्राहकांनी ही फाईल इन्स्टॉल केल्यानंतर ॲप कॅमेरा मायक्रोफोन लोकेशन कॉन्टॅक्ट आणि एमएमएस सारख्या अनेक परवानगींची मागणी करते. परवानगी मिळाल्यावर हॅकर्स ग्राहकांच्या डिव्हाइस वर पूर्ण नियंत्रण मिळवता येते. यामुळे पासवर्ड ओटीपी आणि इतर संवेदनशील माहिती हॅक करून बँक खात्यातील पैसे चोरले जातात.

सतर्क राहण्यासाठी काय करावे ?

  • अनोळखी स्त्रोतांमधून एपीके फाईल डाऊनलोड करू नयेत.
  • कोणत्याही लिंक वर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा.
  • नेहमी अधिकृत ॲप फक्त गुगल प्ले स्टोअर वरून किंवा ॲपल ॲप स्टोअरमधून डाऊनलोड करावी.
  • सशास पद मेसेज किंवा कॉलवर्स विश्वास ठेवू नका.

ग्राहकांनी फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एसबीआय किंवा कोणत्याही बँक कधीही तुमच्याकडून संवेदनशील माहिती मागत नाही. त्यामुळे सावध राहा आणि सुरक्षित व्यवहार करा आणि कुठल्याही लिंक वरती क्लिक करू नका.

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *