SBI Account Opening Yono | एसबीआय बँक खातेदारांसाठी आनंदाची व अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ऐकून ग्राहक आनंदी होणार आहेत. जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असेल ही बातमी नक्की वाचा. स्टेट बँक ऑफ इंडिया ने याबाबत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे ती म्हणजे आता प्रदेशात राहणाऱ्या भारतीय म्हणजे NRI देखील एसबीआय बँकेचे खाते उघडू शकणार आहात.
स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन नवीन योजना आखत असते. मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने NRI आणि NRO या खात्यासाठी मंजुरी दिली आहे. ग्राहकांच्या माध्यमातून यासाठी वारंवार अपील होत असताना बऱ्याच दिवसांपासून ही मागणी स्थगित होती बऱ्याच काळापासून ही मागणी आता पूर्ण झाली आहे. एसबीआय बँकेने आता NRI लोकांसाठी खाती उघडण्यास परवानगी दिली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन सुविधा केली सुरू
स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन नवीन योजना आखत असते. या योजना ग्राहकांसाठी आकर्षित आणि खास ठरतात. या योजनेअंतर्गत ग्राहकांना नवीन नवीन सुविधांचा लाभ मिळतो. एसबीआय ने सुरु केलेली नवीन सुविधा अंतर्गत आता प्रदेशात राहणाऱ्या लोकांना देखील खाते उघडते येणार आहेत. ही सुविधा कशाप्रकारे लोक वापरू शकतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे ऑफिशियल असणारे ॲप म्हणजे YONO SBI या ॲपच्या माध्यमातून डिजिटल सुविधा लोकांपर्यंत उपलब्ध होते. या यामध्ये बँकेचे सर्व कामे उपलब्ध आहे. खाते उघडण्यापासून ते खाते बंद करण्यापर्यंत सर्व कामे अँप मध्ये ऑनलाईन माध्यमातून पूर्ण होतात.
बँकेने सुरू केलेली ही नवीन योजना Yono sbi त्याच्या माध्यमातून तुम्ही लाभ घेऊ शकता. परदेशात राहणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रदेशात राहणाऱ्या लोकांना देखील खाते उघडता येणार आहेत.