Rein Alert | राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानामध्ये बदल होत आहे. या बदल्यामुळे शेती पिकावर मोठा परिणाम झाल्याचे पाहिला मिळत आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.
शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास माती मोल झाला. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हातबल झालेला आहे. याच बाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी नुकताच एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामानाबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पंजाब डक एक हवामान अभ्यासक आहेत. ते शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन नवीन हवामान अंदाज नेहमी वर्तवत असतात. पंजाबराव डक यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडिया वरती (youtube) हवामान अंदाज दिलेला आहे.
पंजाबराव यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी एक हवामान अंदाज वर्तवला होता. त्या हवामान अंदाज मध्ये पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भामध्ये काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीटीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
याचमुळे पंजाबराव यांनी दिलेला नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. तसेच पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेण्याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे.
पंजाब डक यांचा हवामान अंदाज
पंजाबराव डोक्यांनी दिलेल्या हवामान अंदाज मध्ये 16 ते 17 फेब्रुवारी रोजी लवकरच राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची सुरुवात होणार असा अंदाज वर्तवला आहे. डक यांचा अंदाजामध्ये म्हणतात आपली पिके आलेले 29 फेब्रुवारी पर्यंत लवकरात लवकर काढून घ्या. तसेच काढणी झाल्यानंतर पिके व्यवस्थित झाकून ठेवा. 29 फेब्रुवारीपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे वातावरण तयार होणार आहे, असे पंजाबराव यांनी सांगितले आहे.
पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 29 फेब्रुवारी नंतर राज्यात अवकाळी पावसाबाबत सविस्तर अंदाज दिला जाईल. परंतु शेतकऱ्यांनी 29 फेब्रुवारी पर्यंत काढणी आलेले ज्वारी, हरभरा, गहू काढणी पूर्ण करावी. फेब्रुवारी पर्यंत राज्यात कुठेही मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी अंदाजानुसार पुढचे नियोजन करावे.