Ration Holders | राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने 2023 ते 2028 या पाच वर्षासाठी महत्त्वाचा एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता दिली आहे. त्या अंतर्गत राज्यातील दारिद्र रेषेखालील कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येणार आहे. त्यानुसार वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्र मार्गावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
राज्यामधील अत्योदय (Ration Holders) शिधापत्रिक धारकांसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या सणा दिवशी या साडीचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना सणा दिवशी शासनामार्फत एक साडी मोफत दिली जाणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 27 हजार सात लाभार्थ्यांना या साडीचे लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्रीयन सणाला मिळणार साडी
शासनाद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत आता महाराष्ट्र मधील प्रत्येक सणा दिवशी नागरिकांना मोफत साडी देण्यात येणार आहे. शासनाने चैत्र पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती आणि दिवाळी सणा निमित्त रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून आनंदाचा शिधा देण्याची मोहीम हाती घेतली होती. आता राज्य सरकारकडून राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यानुसार राज्य यंत्रमाग महा मंडळाची ही संस्था योजना राबविण्यात येणार असून राज्यातील 24 लाख 58 हजार 747 गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तालुक्याचे नाव आणि लाभार्थ्यांची संख्या
- सातारा 1833
- कोरेगाव 1311
- कराड 6331
- पाटण 3084
- मान 2900
- फलटण 4125
- खंडाळा 1169
- वाई 1510
- महाबळेश्वर 579
- जावळी 1718
- एकूण 27007
अशी केली जाईल कार्यवाही
साडी वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. ती एक साडी सरकार महामंडळाकडून 355 रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन वाहतूक जाहिरात प्रसिद्ध साठवणूक हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.