Ration Card News: रेशन कार्ड अंतर्गत मोफत अन्न वितरित केले जात आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत अनेक गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे सरकारने धान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी व लाभार्थ्यांना मोफत रेशन धान्याचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्ड मधील प्रत्येक लाभार्थ्यांची केवायसी करणे आवश्यक आहे.
रेशन कार्ड धारकांना ही केवायसी पूर्ण करण्यासाठी अन्नपुरवठा विभागाने 28 फेब्रुवारी पर्यंत चौथ्यांदा मुदत वाढून दिली आहे. यानंतर याची मुदत वाढण्याची शक्यता फारच कमी वर्तवली जात आहे. त्यामुळे या कालावधी आधी ई केवायसी प्रक्रिया न केल्यास त्या रेशन कार्डधारकांचे नाव शिधापत्रिकेतून कायमचे कमी करण्यात येणार आहे आणि त्याचा रेशन पुरवठा कायमचा बंद होणार आहे. Ration Card News
हे पण वाचा | मागेल त्याला कृषी पंप योजनेतील वेंडरची निवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
देशांमध्ये रेशन कार्डधारकांना सरकारी योजनेअंतर्गत मोफत धान्याचा पुरवठा सध्या होत आहे. यामध्ये बोगस रेशन कार्ड धारकांना धान्य पुरवठा मिळू नये यासाठी अन्नपुरवठा विभागाने हा उपाय काढला आहे. यामध्ये आता संबंधित रेशन दुकानदाराकडील पॉस मशीन द्वारे तुम्ही तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी दोन वर्षापासून अन्नपुरवठा विभागाद्वारे लाभार्थ्यांकडे सातत्याने पुरवठा केला जात आहे.
आता रेशन कार्डधारकांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 28 फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिली आहे. मात्र अजून देखील 32.65% लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. मध्यंतरी काही दिवस पोस्ट बंद होत्या त्यामुळे नियमितपणे प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. मात्र त्यानंतर नियमितपणे सर्व प्रक्रिया सुरू आहे. मात्र रेशन लाभार्थ्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला रेशन संबंधित कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
हे पण वाचा | हैरान करणारी आकडेवारी; लाडकी बहीण योजनेतून एवढ्या महिला अपात्र? पहा सविस्तर..
रेशन दुकानात ई केवायसी करण्यासाठी फक्त आधार कार्ड व शिधापत्रिका या दोनच कागदपत्राची आवश्यकता आहे. मात्र तरीदेखील लाभार्थ्यांद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. लाभार्थ्यांची शिधापत्रिका आधार कार्ड सोबत लिंक केल्यानंतर संबंधित रेशन कार्ड धारकांचा आधार क्रमांक अचूक आणि तोच आहे. याची पडताळणी या प्रक्रिये द्वारे केले जाते. ओळख व पत्ता यासाठी देखील ही प्रक्रिया महत्त्वाची आहे.
शिधापत्रिकेत जास्त लाभार्थ्यांचे नाव आहेत त्या सर्व व्यक्तींना आधार कार्ड घेऊन ई केवायसी करणे सक्तीचे करण्यात आले ज्या व्यक्तीने इ केवायसी केली नाही त्याचे नाव शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहे. परिणामी त्यांना शिधापत्रिके संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही आणि मोफत रेशन देखील मिळणार नाही. शिधापत्रिका बंद झाल्यानंतर याबाबतची सर्वस्व जबाबदारी व्यक्तिगत त्या लाभार्थ्याची असेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा