HSC SSC Board Exam: येत्या काही दिवसात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षेच्या दिवसांमध्ये अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली असतात. अशातच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शालेय शिक्षण महामंडळाने ऑनलाइन समुपदेशनाची सूचना दिल्या गेल्या आहेत. या समुपदेशाने विद्यार्थ्यांना आलेला मानसिक तणाव, निराशा इत्यादी गोष्टी पासून बाहेर काढले जाणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित परीक्षा देता येतील आणि त्यांचे भवितव्य चांगले घडेल. यामध्ये आणखीन काय फायदा मिळेल याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
हे पण वाचा | मागेल त्याला कृषी पंप योजनेतील वेंडरची निवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
राज्य महामंडळाने 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान इयत्ता बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा होणार आहेत. पुणे नागपूर छत्रपती संभाजी नगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या विभागीय महामंडळामार्फत या परीक्षा घेतल्या जात आहेत. HSC SSC Board Exam
दरम्यान यावर्षी कॉफीमुक्त परीक्षा घेण्यासाठी महामंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कॅमेरे बसवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर ज्या कॉफी सेंटरवर या अगोदर कॉपी झाली म्हणून तक्रारी आले आहेत त्या सेंटरवरील सर्व शिक्षक दुसऱ्या सेंटरवर पाठवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परीक्षा दरम्यान कोणताही गैरप्रकार घडल्यास त्यावर अजामीन गुन्हा दाखल होणार असल्याचे देखील समोर आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे पण वाचा | रेशन कार्ड मधून या नागरिकांचे नाव कायमचं होणार कमी..! काय आहे कारण? पहा सविस्तर..
समुपदेशन म्हणजे काय?
विद्यार्थी मित्रांनो समुपदेशक हे विद्यार्थ्यांना व पालकांना परीक्षा संबंधित मानसिक तणावापासून दूर करण्यासाठी मार्गदर्शन करते. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे कोणत्याही शुल्क न घेता समुपदेशन दिले जाते. शासनाच्या या सेवेचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या मानसिकतेवर ताण कमी करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी करावा. असे राज्य महामंडळाने आव्हान केले आहे.
हे पण वाचा | हैरान करणारी आकडेवारी; लाडकी बहीण योजनेतून एवढ्या महिला अपात्र? पहा सविस्तर..
विद्यार्थ्यांनी समुपदेशनवर काय विचारावे?
विद्यार्थी आणि पालकांनी समुपदेशकांना परीक्षा केंद्र बैठक व्यवस्था आणि प्रश्न पत्रिका संबंधित प्रश्न विचारू नयेत, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. शासनाचा हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. या समुपदेशन सेवा विद्यार्थ्यांना मानसिक तणापासून आणि परीक्षेच्या भीतीपासून दूर ठेवण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक त नावासाठी या उपक्रमाची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे.
हे पण वाचा | लडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट! या महिलांचे टेन्शन वाढणार?
समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक
9011302997, 8263876896, 8767753069, 7387400970, 9960644411, 7208775115, 8169202214, 9834084593, 8329230022, 9552982115.