महाराष्ट्रात होणार जोरदार अवकाळी पाऊस? पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PunjabRao Dakh Havaman Andaj: दोन-तीन दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की, अवकाळी पाऊस होणार आहे का नाही? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव म्हणाले आहेत की 14 जानेवारीपासून राज्यातील हवामान थोडेसे बिघडणार आहे. 14 जानेवारी 15 जानेवारी आणि 16 जानेवारी रोजी राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. परंतु या काळामध्ये राज्यातील कोणत्याही भागात पाऊस पडणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शेतीतील कामात कोणतीही घाई गडबड करू नका असे आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे.

भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात आगामी काही दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जारी केला नाही. मात्र पुढील तीन दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. असे हवामान तज्ञांनी शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून पुन्हा एकदा शेती पिकाचे नुकसान होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. असे असताना ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात खरंच पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. मात्र राज्यातील उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. मात्र महाराष्ट्रात फक्त ढगाळ हवामान राहणार आहे. राज्यातील कोणत्याही भागात अवकाळी पाऊस होणार नाही असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. सध्या राज्यात पावसाचे वातावरण नाही फक्त 14 जानेवारीपासून राज्यातील हवामान थोडेसे बिघडणार आहे. 14 जानेवारी 15 जानेवारी आणि 16 जानेवारी रोजी राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान पहायला मिळणार आहे. परंतु राज्यात कुठेही पाऊस पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्याने घाबरून जाऊ नका असे पंजाबराव डख म्हणाले आहेत.

राज्यात पुढील काही दिवसात थंडीची अनुभूती येणार आहे. राज्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होईल आणि कडाक्याची थंडी जाणवेल असे पंजाबराव यांनी म्हटले आहे. मात्र 14 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. ढगाळ हवामानामुळे शेती पिकावर रोगराईचे परिणाम होण्याची शक्यता आहे. पण राज्यात कुठेही पाऊस पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होणार नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे असेही पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात 26 जानेवारी नंतर अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळू शकते असे पंजाबराव डख यांचे म्हणणे आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. याबाबत नवीन अपडेट पुढील वेळेस सांगण्यात येईल असे पंजाबराव यांनी सांगितले आहे. PunjabRao Dakh Havaman Andaj

1 thought on “महाराष्ट्रात होणार जोरदार अवकाळी पाऊस? पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज..”

Leave a Comment