PM Mudra Loan YojanaPM Mudra Loan Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Mudra Loan Yojana: नमस्कार मित्रांनो, व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी आज अर्थसंकल्प सादर करताना सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजकाल तरुणांना छोटा उद्योग धंदा उभारण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. अशा वेळेस भांडवल कुठून उभा करावे असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित असतो. आशा तरुणांसाठी मुद्रा योजनेअंतर्गत पूर्वी तरुणांना 10 लाख रुपये कर्ज बँकेकडून मिळत होते. त्याचबरोबर खूप कागदपत्रांची मागणी केली जात होती. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.

केंद्राचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात युवकांना रोजगार मिळवण्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आलेले आहेत. या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा वाढवण्यात आले आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयाचे कर्ज मिळत होते मात्र यात आता वाढ करून 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. काय आहे ही योजना जाणून घेऊया.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात वेगाने वाढणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा फायदा घेत नवनवीन घोषणा करण्यात आलेले आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेतील कर्ज रक्कम वाढवण्यात आली आहे. नवीन नियमानुसार आता प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी 20 लाख रुपये कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आधी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. त्यात आता वाढ करून 20 लाख रुपये करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ एप्रिल 2015 रोजी चालू केली होती. या योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी 10 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेत तरुणांना दिलेल्या कर्जाला मुद्रा कर्ज असे नाव देण्यात आले आहे. कोणत्याही भागातील नागरिकांना व्यवसाय किंवा व्यापार, बिगर शेती उत्पन्न देणार उद्योग निर्माण करायचा आहे त्यांना वीस लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. मुद्रा कर्जासाठी बँक, MFI व एन बी एफ सी या संस्थेची संपर्क साधावा.

या योजनेअंतर्गत एक ते पाच वर्षाच्या परतफेडी वर कर्ज काढता येते. व्यवसाय वाढीसाठी तीन विविध टप्प्यावर कर्ज मिळते. कर्जाचा प्रकार आणि लागू झालेल्या मुद्रा योजना व्याजदरावर आकारला जातो. सुलभ कर्ज मिळाल्यास तरुणांना रोजगारासाठी प्रेरणा मिळते म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. कारण तरुणांना व्यवसाय उभारताना भांडवल हीच मुख्य समस्या निर्माण होते. PM Mudra Loan Yojana

मुद्रा योजने साठी या पूर्वी बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी खूप कागदपत्राची मागणी केली जात होती. त्यामुळे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागत होता. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना सूक्ष्म आणि मध्यम उद्योगासाठी एक महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना आहे. याची कर्ज मर्यादा वीस लाखापर्यंत केल्यामुळे तरुणांना नक्कीच फायदा होणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

By Rushi

3 thoughts on “अर्थसंकल्पात मोठा निर्णय! प्रधानमंत्री मुद्रा योजनेत 10 लाख नाही तर 20 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *