PM Kisan Yojana 19th installment : भारत सरकार अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार चार महिन्याच्या अंतराने, तीन समान हफ्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती यशस्वीरित्या जमा झालेली आहेत. PM Kisan Yojana 19th installment
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार?
- प्रसार माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार 19 वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान संबंधी योजनेचे 18 व हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे त्या योजनेच्या नियमाप्रमाणे प्रत्येकी चार महिन्यांच्या अंतराने हप्ता जमा होतो त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 व हप्ता गमावण्याची शक्यता आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पहा
- पी एम किसान योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- मुख्य पृष्ठावर लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक भरा आणि सबमिट करा.
मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा
- पीएम संविधान कृती वेबसाईटवर जा अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावरती क्लिक करा नोंदणीकृत आधार क्रमांक टाकून नवीन मोबाईल नंबर सबमिट करा त्यानंतर पडताळणीसाठी जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला (CSC ) देखील भेट देऊ शकता.
शेतकऱ्यांनी ही माहिती योग्य प्रकारे समजून घेऊन त्यांच्या खात्याची आधार लिंक करणे व मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. तरच त्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. 19 व्या हप्त्यासाठी उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की, लवकर त्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे.