PM KISAN YOJANA | पी एम किसान लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक वेळेस पैशांची गरज भासते. त्यावेळी शेतकरी बँकेतून कर्ज घेताना परंतु बँक वेळेवर कर्ज देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी तडजोड करावी लागते.
परंतु आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळणे सोपं करण्यासाठी केंद्र सरकारने KCC सुविधा सुरू केली आहे. या सुविधांतर्गत मंत्रालयाने किसान शरण पोर्टल सुरू केली आहे.
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असं किसान कर्ज पोर्टलवर अर्ज करू शकता. वास्तविक या पोर्टलवर शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध असणार आहे. या पोर्टलवर अद्याप कोणतेही शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसेल तर ते शेतकरी आधार कार्ड मध्ये त्यांनी सहज नोंदणी करू शकणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी केसीसी द्वारे कर्ज घेतले आहे. त्यांनी या माहिती सहज उपलब्ध होणार आहे. देशातील अनेक शेतकरी केसीसी च्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात.
KCC लाभार्थी पडताळणी मॅन्युअल असायची पण आता किसान लोन पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळणे सोपे झालेले आहे. शेतकरी कर्ज वेळेवर भरत नसल्याची तक्रार अनेक बँका करत असतात अशा परिस्थितीमध्ये ही समस्या संपवण्यासाठी सरकारने आवश्यक पाऊल उचलले आहे.
शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्ज
किसान कर्ज पोर्टलवर शेतकऱ्यांची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी केसीसीच्या माध्यमातून सहज कर्ज घेऊ शकतात. सावकाराकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी केसीसी मार्फत अनुदान कर्ज घ्यावे हा सरकारचा उद्देश आहे.
त्यासाठी ज्या शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहे. त्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. त्यासाठी तुम्ही केसीसी कार्डद्वारे सहज कर्ज घेऊ शकता.
जर एखाद्या शेतकरी ने कर्ज घेतले व त्याची वेळेत परतफेड केली तर सरकार त्याला अतिरिक्त लाभ देईल याशिवाय किसीसी कार्डावर शेतकऱ्यांना कमी दरामध्ये सहज कर्ज उपलब्ध होणार आहे.