PM KISAN YOJANA | केंद्र सरकारची सर्वात मोठी लोकप्रिय योजना म्हणजे पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी 2019 मध्ये करण्यात आली होती आतापर्यंत या योजनेअंतर्गत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरची वितरित करण्यात आले आहे. मोदी सरकारची महत्वकांशी योजना आहे.
पी एम किसान योजनेबाबत कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी मोठी माहिती दिली आहे. प्रसार माध्यमातून सतत शेतकऱ्यांना आश्वासन दिले जात होती की, सहा हजार रुपये वरून आठ हजार ते बारा हजार रुपये प्रति वर्षे करण्यात येणार आहे. या विषय त्यांनी बोलताना महत्त्वाची माहिती दिली
याबाबत त्यांनी सांगितले की असे कोणतेही आश्वासन किंवा प्रस्ताव नाही 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती तसेच पुढे देखील चालू राहणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रगतीची माहिती देताना मंत्री म्हणाले की सरकारने आत्तापर्यंत अकरा कोटीहून अधीक्षक शेतकऱ्यांना पंधरा हप्त्यामध्ये 2.81 लाख कोटी रुपये अधिक रक्कम वितरित केलेली आहे. जमीन धारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा लाभ दिला जात आहे असे देखील त्यांनी सांगितले.
पीएम किसान जगातील सर्वात मोठी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी मदत केली जाते. या योजनेचा लाभ थेट डीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतो.
शेतकरी केंद्रित डिजिटल पायाभूत सुविधामुळे कोणतेही मध्यस्थ्यांचा सहभागाशिवाय या योजनेचा लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची खात्री देखील झाली आहे असे कृषिमंत्री मुंडा म्हणाले