Panjba Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि हवामान अंदाज विषयी बातमी समोर आलेली आहे. राज्यात पुन्हा हवामानात मोठा बदल झालेला असून पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. भारती हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत राज्यातील प्रमुख काही भागांमध्ये काही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. Panjba Dakh Havaman Andaj
याच पार्श्वभूमी वरती महाराष्ट्रातील लोकप्रिय हवामान अभ्यासक पंजाब डख राज्यात 27 ते 29 यादरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमी वरती मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, शेगाव, अकोट, खामगाव, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, आणि पुणे जिल्ह्यामध्ये 27 ते 29 दरम्यान अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आगामी काही दिवस राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे पाऊस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरू शकते. ज्या भागास शेती पिकांचे लागवडीचे काम सुरू आहे. त्यांना देखील ठरू शकते परंतु सर्व शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा देखील दिला आहे.
कारण या काळात अवकाळी पावसामुळे काही वेळा पिकांवरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्याचबरोबर यावेळी पावसाची सर्व माहिती आणि सूचना वेळोवेळी स्थानिक हवामान विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेती शेती पिकांचे नियोजन करायचे आहे.