Panjab Dakh Live : राज्याच्या हवामानाबाबत राज्याचे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी दिलेला हवामान अंदाज मध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडी अचानक गायब झालेले आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे राज्यातील गहू, हरभरा, द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. अशातच पुन्हा एकदा पंजाबरावांनी हवामान अंदाज म्हटले की, राज्यात काही भागात गारपीट होणार आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर हवामान अंदाज. Panjab Dakh Live
हवामान अभ्यासाक पंजाबराव यांनी 25 डिसेंबर रोजी हवामान अंदाज वर्तवलेला आहे. हे हवामान अंदाज मध्ये 30 डिसेंबर पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आव्हान देखील त्यांनी यावेळी केली आहे.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 26 डिसेंबर पासून हवामानात बदल होणार काही पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच हा अंदाज 29 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. 29 डिसेंबर पर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडेल या ठिकाणी गारपीटीची सुद्धा शक्यता वर्तवली आहे.
पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज मध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर, मराठवाडा, पुणे, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी त्यांचा हवामान अंदाज लक्षात घेऊन पुढचे नियोजन करायचे आहे.