Onion Subsidy 2023 : महाराष्ट्र राज्य शासनाने फेब्रुवारी व मार्च महिन्यात कवडीमोल दरामध्ये शेतकऱ्यांना कांदा विकावा लागल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदानाची घोषणा केली आहे. मार्च महिन्यामध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे व फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति शेतकरी दोनशे रुपये क्विंटल च्या मारुती मध्ये अनुदान जाहीर केले आहे.
एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व खाजगी बाजार समिती आणि नाफेड कडे ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकला असेल तेच शेतकरी या अनुदानासाठी पात्र राहणार आहेत. पण अनुदानाची घोषणा होऊन जवळपास सहा महिन्यांपेक्षा अधिक सकाळ उलटून गेला आहे तरीही अजून एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर यादीमध्ये तुमचे नाव पहा
यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संतापाचे वातावरण तयार झालेले आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाने कांदा अनुदानासाठी आवश्यक असलेले 857 कोटी रुपयांपैकी 465 कोटी 90 लाख रुपयांचा निधी विभागाकडे दिलेला आहे.
व राज्य शासनाने अनुदानासाठी पात्र ठरलेले 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाची रक्कम आणि दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये अनुदान रक्कम देण्यात येईल असे जाहीर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या जिल्ह्याचे शेतकऱ्यांसाठी काना अनुदान 10 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची गरज आहे अशा 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानाची शंभर टक्के रक्कम देण्यात येणार आहे.
व ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कांदा अनुदानासाठी रक्कम दहा कोटींपेक्षा अधिक आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दोन टप्प्यात मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के रक्कम
रायगड नागपूर सातारा सांगली अमरावती ठाणे चंद्रपूर बुलढाणा वर्धा लातूर अकोला यवतमाळ वाशिम जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान रक्कम मिळणार आहे म्हणजे या शेतकऱ्यांना एकाच टप्प्यामध्ये संपूर्ण अनुदान मिळणार आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दोन टप्प्यात अनुदान
बीड कोल्हापूर औरंगाबाद धुळे उस्मानाबाद जळगाव पुणे सोलापूर नगर व नाशिक या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदान मिळणार आहे विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दहा हजारांपेक्षा जास्त असणार आहे त्यांना पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये एवढी रक्कम मिळणार असल्याचे समोर येत आहे.
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला असे शासन निर्णय माहिती लवकरात लवकर हवी असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर शासन निर्णय मिळतील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा