कांद्याला चांगला हमीभाव मिळावा असे वाटत असेल तर हे काम करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market In India: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आपण काही महत्त्वाची माहिती देणार आहोत. कांदा हे प्रामुख्याने हिवाळी हंगाम येथल पीक असल्याने या हंगाम्यात लावलेल्या कांद्याची काढणी फक्त मार्च ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असते. त्यानंतर खरीप हंगाम्यात जून-जुलैमध्ये लावलेलं कांदा ऑक्टोबर-नोव्हेंबर शिवाय बाजारात विक्रीसाठी येत नाही.

उन्हाळ्यात कांद्याच्या बाजारभावात होणारा चढ-उतार थांबवण्यासाठी आणि गिऱ्हाईकाची मागणी ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत पुरवण्यासाठी उन्हाळी कांदा चार ते सहा महिने चांगल्या परिस्थितीत साठवून ठेवणे गरजेचे आहे. तसेच कांदा पिक वातावरणातील कमी जास्त तापमानामुळे होणारी वजनामध्ये 20 ते 25 टक्के घट, कांद्याची सड 10 ते 12 टक्के होते, होण्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के, यामुळे कांद्याचे उत्पादनात घट होते.

या सर्व गोष्टीवर व साठवण क्षमता वाढवण्यासाठी शेतकऱ्याला उपयुक्त असे कांदा काढणी व साठवण तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ करू शकतात.

कांदा काढणी तंत्रज्ञान काय आहे?

शेतकऱ्याने कांदा काढण्यापूर्वी किंवा थोडे अगोदरच पिकाचे पाणी बंद करावे. यामुळे पुढील तीन आठवड्यात कांदा पक्व होऊन कांद्याची नैसर्गिकरित्या पात पडते व कांदा काढणीस तयार होतो. यामुळे होते असे 50 टक्के पानातील अन्न रस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होऊ लागतो. या कालावधीमध्ये कांद्याचा पापुद्रा पक्व होऊन कांद्याला चांगला रंग येतो व कांदा घट्ट होतो.

कांदा काढल्यानंतर तंत्रज्ञान काय आहे?

  1. 50% कांद्याची पात नैसर्गिकपणे पडल्यानंतर कांदा काढणीस सुरुवात करावी.

कांद्याची लागवड केल्यानंतर शंभर ते 110 दिवसात काढणीस तयार होत असतो. कांदा पक्व झाला की नवीन पाहत येण्याचे थांबते. पातीचा रंग पिवळा दिसू लागतो. याच वेळेस कांद्याच्या वर्षाचा भाग मऊ होऊन आपोआप वाढतो व पात कोलमडून जाते. यालाच आपण कांद्याची पात पडणे असे म्हणतो.

50 टक्के कांद्याच्या पाती पडल्यानंतर कांदा काढणी करावी. या काळामध्ये कांदा परी पक्व होऊन कांद्यामध्ये साठवणुकीसाठी आवश्यक असणारे बदल घडवून येत असतात. तसेच या काळात कांद्याच्या मानेची जाडी कमीत कमी असते. Onion Market In India

2. काढणे नंतर कांदा शेतात पातीसकट 4 ते 5 दिवस वाळविण्यात यावा.

या काळात कांदा पतीमध्ये निर्माण झालेले साठवणुकीत कांद्याला सुप्तपणा देणारे संप्रेरक हे हळूहळू पातीमधून कांद्यामध्ये उतरत असतात. त्यामुळे पात सुकेपर्यंत कांदा शेतात वाळविणे आवश्यक आहे. परंतु असा कांदा शेतात वाळविताना एक खबरदारी घेणे गरजेचे आहे. ती म्हणजे कांदा ठीक न करता पहिला कांदा दुसऱ्या कांद्याच्या पतीने झाकला जाईल अशा पद्धतीने कांदा जमिनीवर एकसारखा पसरून कांदा शेतात वळविला गरजेचे आहे.

3. कांद्याची मान तशीच ठेवून पात कापणे

कांद्याचे पाच सुखेपर्यंत शेतात वाळवल्यानंतर प्रथम कांद्याच्या मानेला पीळ देऊन तीन ते चार सेंटीमीटर मन ठेवूनच कांद्याची पात कापावी. हा महत्त्वाचा टप्पा असून त्यामध्ये पुढील काळात कांद्याचे तोंड पूर्णपणे बंद राहून सुषमा जिवाणूच्या शिरकावामुळे कांदा सडणे, कांद्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन वजनात घट होणे, कांद्याच्या तोंडातून कांद्याला मोड येणे यासारख्या साठवणुकीत नुसकान होत नाही.

कांद्याला जर अजिबात मान्य ठेवली तर कांद्याचे तोंड उघडं दिसून कांद्याची पात पूर्णपणे कापली तर कांदे साठवणुकीत टिकत नाहीत व मोठ्या प्रमाणात नसून खराब होतात. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादनात मोठी घट होते. अशाप्रकारे तुम्ही कांद्याला चांगला भाव मिळूवू शकता.

हे पण वाचा:- वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा हक्क काय? जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट? या आहेत 10 महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “कांद्याला चांगला हमीभाव मिळावा असे वाटत असेल तर हे काम करा”

Leave a Comment