NPS Update | पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. पेन्शन फंड नियमक PFRDA ने नॅशनल पेन्शन सिस्टम संबंधित एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार कार्ड द्वारे पडताळणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. हा नियम आता एक एप्रिल पासून लागू होणार आहे.
आत्ताच हाती आलेल्या प्रसारमाध्यमाच्या माहितीनुसार PFRDA ने नवीन नियमाची माहिती देणारे पत्रक जारी केलेली आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम सदस्यांचे तसेच इतरांचे हित लक्षात घेऊन सेंट्रल रेकॉर्ड कॉपिंग एजन्सी रॅलीमध्ये लॉगिन करण्यासाठी आता अधिक काळजी घेतली जाणार आहे.
सध्या नॅशनल पेन्शन सिस्टम सदस्यांना खात्यात लॉगिन करण्यासाठी वापर करता आयडिया आणि पासवर्ड आवश्यक आहे. याच द्वारे खात्यातील बदल आणि पैसे काढणे शक्य आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारने नोडल अधिकारी सी आर ए प्रणाली मध्ये लॉगिन करण्यासाठी पासवर्ड आधारित प्रणालीवर अवलंबून आहेत. ते अधिक सुरक्षित करण्यासाठी आता आधार आधारित पडताळणी सोडली जाणार आहे.
PFRDA नुसार आधारित लॉगिन पडताळणी NPS सदस्यांच्या आयडीसी लिंक केले जाणार आहे. यानंतर आधार कार्ड लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर प्राप्त झालेला ओटीपी टाकल्यानंतर खात्यात मध्ये लॉगिन केले जाऊ शकते.
NPS खात्यामध्ये पैसे कधी काढू शकता ?
- NPS मध्ये तुम्ही काही विशिष्ट परिस्थितीत पैसे काढू शकता.
- घर खरेदी करण्यासाठी तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टिम खात्यामधून पैसे काढू शकता.
- तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी ही खात्यातून पैसे काढू शकता.
- कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टम मधून पैसे काढू शकता.
- तुम्ही नवीन व्यवसाय किंवा स्टेटस सुरू करायचा विचार करत असाल तर तुम्ही खात्यामधून पैसे काढू शकता.
- कौशल्य विकास कर्जासाठी तुम्ही खात्यामधून पैसे काढू शकणार आहात.
- अपघात झाला किंवा इतर आजार किंवा इतर कारणासाठी देखील तुम्ही पैसे काढू शकता.