New Cotton Rate Update: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. येत्या दहा दिवसात कापसाच्या बाजारभावात मोठे वाढ होण्याची संकेत बाजार तज्ञ लोकांनी व्यक्त केले आहेत. याविषयी सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहू शकता. जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर ही पोस्ट शेवटपर्यंत पूर्ण वाचा.
कापसाला चांगला बाजार भाव मिळावा या आशेवर सर्व शेतकरी अजूनही कापूस घरात ठेवून बसले आहेत. त्याच अनुषंगाने सध्या एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे या बातमीच्या आधारे कापसाचे बाजार भाव तब्बल 3000 रुपये प्रतिक्विंटल इतके वाढणार आहेत. सध्या कापसाचे भाव 7000 रुपये प्रति क्विंटल एवढे असून, आणखीन 3000 रुपये प्रति क्विंटल एवढे वाढल्यानंतर 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव कापसाला मिळू शकतो.
कापूस पिकाचे बाजार भाव कशामुळे वाढणार आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया. यावर्षी सर्वत्र अतिवृष्टी तसेच वेळेवर पाऊस न झाल्याने काही भागांमध्ये कापसाचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे कापसाचे पीक हे कमी झाले आहे उत्पन्न कमी झालेले आहे त्यामुळे कापड उद्योजकांना कापसाची गरज भासत आहे.
हे पण वाचा:- ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! आज झालेल्या बैठकीत ऊसाच्या दरावर तोडगा निघाला
New Cotton Rate Update
दरवर्षीप्रमाणे कापसाचे उत्पन्न न झाल्याने बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे. कापूस उद्योजकांना सहजासहजी कच्चामाल म्हणजेच कापूस मिळत नाही त्यामुळे ज्या भावात मिळेल त्या भावाचा देवापारी कापूस घ्यायला तयार होणार आहेत. लवकरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे.
कापसाच्या भाव वाढीबद्दल सुमारे सांगायचे म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत उपकर यांनी सोयाबीन तसेच कापूस पिकाच्या दरवाढी बद्दल सरकार दरबारी मागणी केली या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले असून कापूस सोयाबीन पिकाचे बाजार भाव लवकरच वाढण्यात येतील असा अंदाज सांगितला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत उपकरणे सोयाबीनला 9000 रुपये व कापसाला 12500 रुपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे लवकरच निर्णय घेतील आणि कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकाच्या बाजारभावात वाढ मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! तुरीला मिळाला 10 हजार भाव, वाचा सविस्तर माहिती