Friday

14-03-2025 Vol 19

देशातील व राज्यातील कापूस, कांदा, सोयाबीन बाजारभावात होणार वाढ? पहा काय म्हणतात तज्ञ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National Agriculture Market: नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये व बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजार भाव आता फारच कमी झाले आहेत. त्याचबरोबर यंदा कापूस व सोयाबीन दरात देखील घसरण पाहायला मिळाली आहे. कांद्याचे दर वाढले होते पण ते फारसे का टिकले नाहीत. यावर्षी उत्पन्नात मात्र दुप्पट कमी झाले आहे तरी पिकांना योग्य दर मिळाला नाही.

मित्रांनो यंदा राज्यामध्ये बऱ्याच घडामोडी आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्याचप्रमाणे देशात देखील खूप घडामोडी घडले आहेत. यंदा महाराष्ट्र राज्याचा विचार करता मध्यंतरी काळात पावसाचा मोठा खंड पडला होता. त्यामुळे जिरायत पिकाला मोठा फटका बसला आहे.

जिरायत म्हणजे काय: शेतकरी मित्रांनो नेमक जिरायत म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. पावसाच्या पाण्याचे अभावावरती येणारी पिके म्हणजे जिराफ पिके, यामध्ये आपण कापूस सोयाबीन कांदा या मुख्य खरीप हंगामातील पिकाची लागवड करतो. या पिकाचे यंदा उत्पादन कमी असले तरी बाजारभावात मात्र वाढ दिसून येत नाही.

देशातील बहुतांश बाजारामध्ये कांद्याचे भाव सरासरी एक हजार रुपये पेक्षा अधिक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मटका बसत आहे. यंदा कांद्याच्या व बाजार समितीमध्ये कायम टिकून आहे तसेच काही बाजार समिती लाल कांद्याचे आवक दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कांद्याच्या भावात कुठलीच वाट पाहायला मिळत नाही. जसे जसे दिवस चालले आहेत तसे तसे कांद्याचे दर कमी होताना दिसून येत आहेत.

कापसाच्या भावाबद्दल बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजार समितीमध्ये कापसाच्या भावा सुधारणा दिसून आली आहे. बाजार समितीमध्ये भाव वाढले तरी शेतकऱ्यांना मिळणारा भाव कमीच आहे. बऱ्याच राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारला शिव विनंती केली आहे की या मुख्य पिकांना हमीभावात खरेदी करा. केंद्र सरकारने हमीभाव केंद्र सुरू करावे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या मुख्य पिकांना योग्य भाव मिळेल आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या प्रबळ होईन.

मात्र शेतकऱ्यांच्या या विनंतील सरकारने कुठेही मान्य केले नाही. आज पण कापूस 6600 रुपये प्रतिक्विंटल ते 7200 रुपये प्रति क्विंटल आहे. इथून पुढे देखील हाच दर कायम टिकून राहण्याची शक्यता तज्ञांनी सांगितले आहे. या दरामध्ये घट ही दिसून येणार नाही आणि वाढही होणार नाही. ज्याप्रमाणे कापसाचे भावात वाढ होत नाही त्याचप्रमाणे सोयाबीनचे देखील पहायला मिळत आहे.

यंदा कांदा आवक मोठ्या प्रमाणात असल्याने दर वाढत नाहीत. मात्र यानंतर जशी जशी आवक कमी होईल तसे कांद्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. National Agriculture Market

सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. सोयाबीनचे भाव पुन्हा पडल्याचे दिसून येत आहे. कापूस दर देखील आंतरराष्ट्रीय बाजार समितीत घसरलेले दिसून येत आहेत. सध्या कांद्याचे दर देखील घसरलेले आहेत. पण येणाऱ्या काळात भाव वाढ होणार का नाही? हाच प्रश्न देशातील सर्व शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे.

हे पण वाचा:- आता सरकार कडून शेतकऱ्यांना 95% अनुदानावर 3HP, 5HP आणि 7.5HP सौर पंप मिळणार, ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *