Manoj Jarange NewsManoj Jarange News
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Manoj Jarange News : आत्ताच, बीड येथील मनोज जरांगे पाटील यांची सभा झालेली असून, तेथील सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाज बांधव यांच्याशी संवाद साधत सभा केली आहे. या सभेमधून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा देत 20 जानेवारीपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार. यावरून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेट आता संपणार आहे. परंतु सरकारकडून अद्यापं काहीच हालचाल दिसत नाही. या प्रकरणी चर्चा करण्याबाबत फेब्रुवारी, विशेष अधिवेशन भरवल जाईल, असं हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असं असतानाच, बीडमध्ये “मनोज जरांगे पाटील” यांनी मुंबईत 20 जानेवारीला आझाद मैदानावरील अमरण उपोषण करण्याचं जाहीर केलं.

यावरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. सरकार अतिशय सकारात्मकतेने काम करीत आहे. मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालून आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने कामं सुरू केल आहे. शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे, तिसरा अहवाल अपेक्षित आहे. त्यामध्ये निजामकालीन नोंदी हैदराबाद वरून प्राप्त करून घेत आहोत. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील हे काय म्हणाले ?

“सरकारनं मराठ्याला नोटीसा दिल्या, आणि मुंबईत 18 जानेवारी पर्यंत 144 कलम लागू केला. त्यामुळे 20 जानेवारीला मुंबईत आझाद मैदानावर मी अमरण उपोषण करणार. आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील. शांततेच्या आणि कायद्याच्या मार्गाने आपण उपोषण करू, पण कोण कुठे बसल, याची माहिती नाही. रोड मोकळा करून बसण्याची व्यवस्था करावी. नाहीतर, आमच्या धोरणाने आम्ही बसू, मात्र मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली. तर विराट सामुदाय माघारी फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरू,” असा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *