Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जाची फेरपडताळणी सुरू आहे. दरम्यान निकषात न बसणाऱ्या महिला तसेच बनावट कागदपत्र सादर करून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कारवाई होणार असल्याची धास्ती राज्यातील अनेक महिलांच्या मनात निर्माण झाले आहे. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. काही महिला स्वतःहून या योजनेतून माघार घेत आहेत. दरम्यान लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान बनावट कागदपत्राच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाडक्या बहिणींवर पोलीस रीतसर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यापर्यंत योजनेचे सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. Majhi Ladki Bahin Yojana
मात्र पात्रतेची तपासणी सुरू असताना यामध्ये अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनेक महिलांनी या योजनेचा लाभ स्वतःहून नाकारत अर्ज दिला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता काही दिवसापूर्वी महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याची चर्चा होत आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ जोडण्यासाठी अर्ज कसा करावा?
शासकीय योजनेचा लाभ घेणारे आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून दिला जाणारा लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागत आहे. दरम्यान शहरातील काही महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ सोडण्यासाठी अर्ज केले आहेत.
बनावट लाभार्थ्यांवर कारवाई होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार थांबावा यासाठी अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ध पडताळणीची वेळ सप्टेंबर महिन्यातच निदर्शनात आले आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर ट्विट करून दिले आहे. याबाबत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननी बाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.