या तारखेला मिळणार लाडकी बहिण योजनेचे पैसे? अजित पवार यांनी दिली मोठी अपडेट, 3000 रुपये होणार एक सोबत जमा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांनी मोठे अपडेट दिले आहे. जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्रात सून म्हणून आले असेल तर त्या महिला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी महिलांची मोठी लगबग चालू आहे. अनेक महिला सेतू केंद्रावर जाऊ या योजनेसाठी अर्ज करत असल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच एका भाषणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार याबद्दल सांगितले आहे. मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेची पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अजित पवार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता एक सोबत मिळणार आहे.

नुकतेच झालेले अहमदनगर मधील पारनेर या ठिकाणी अजित पवार यांनी एका सभेमध्ये भाषण करताना या योजनेबद्दल आणखीन माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी पासून मिळायला सुरुवात होणार व किती मिळणार याबद्दल माहिती भाषण दरम्यान सांगितली. Majhi ladki Bahin Yojana

सोने, चांदी, मोबाईलच्या किमती कमी! अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग झाले जाणून घ्या संपूर्ण यादी

सर्व महिलांनी फॉर्म भरून घ्या..

लडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे सर्व महिलांसाठी आवश्यक आहे. तो फॉर्म भरून घेण्याचे काम शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशासनातील सहकारी अंगणवाडीत काम करणाऱ्या माझ्या महिला फॉर्म भरण्याचे काम करत आहेत. हा फॉर्म भरताना अनेक अडचणी येत असल्या तरी काळजी करू नका नवीन योजना आहे. थोड्या अडचणी येऊ शकतात एक जुलैपासून ही योजना सुरू केली जात आहे. लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्या असे आव्हान अजित पवार यांनी केले आहे.

घरबसल्या नवीन पॅन कार्ड तयार करा, एकदम मोफत, असा करा ऑनलाइन अर्ज

दोन महिन्याचे पैसे एकत्र देणार

तुमच्या अकाउंटला दर महिना दीड हजार रुपये याप्रमाणे पैसे येणार आहेत. सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्रित देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी म्हणून बसत असला तर तुम्हाला जुलै महिन्यापासूनचे सर्व पैसे दिले जातील.

त्यामुळे काळजी करू नका ज्या गरीब मायमाऊली आहेत त्यांची गरज भागवण्यासाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेमुळे माझ्यावर विरोधकांनी टीका केल्या सर्व घटकातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून म्हणाली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

सिबिल स्कोरची अनोखी ट्रिक..! फक्त 5 दिवसात 750 पेक्ष्या जास्त होईल तुमचा सिबिल स्कोर

लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कधी मिळणार?

येत्या 19 ऑगस्ट या तारखेला रक्षाबंधन आहे. लाडक्या बहिणी योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी सर्व महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटला 19 तारखेला तीन हजार रुपये जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकत्रित देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व गरीब महिलांसाठी योजना चालू केली आहे असे अजित पवार यांनी सांगितले.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “या तारखेला मिळणार लाडकी बहिण योजनेचे पैसे? अजित पवार यांनी दिली मोठी अपडेट, 3000 रुपये होणार एक सोबत जमा”

Leave a Comment

error: Content is protected !!