Mahatma Fule Karj Mafi Yojana:- महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी मधील सरकारने 31 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना ही नवीन योजना चालू केली आहे.
एप्रिल महिन्याच्या दरम्यान घेतलेल्या शेतकऱ्याची थकीत अल्पमुद्दीचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे या योजनेचा उद्देश आहे. मार्च 2015 आणि मार्च 2019 ही कर्जमाफी सप्टेंबर 2019 पर्यंतच्या मुदत आणि व्याजासह दोन लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू केली होती.
या योजनेत जे शेतकरी दुर्लक्षित आहेत किंवा अल्पभूधारक आहेत अशा शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत चे पीक कर्ज सरकार महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत माफ करणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना अंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत अल्पकालीन पीक कर्ज पुनर्गठन किंवा पुनर्गठीत कर्जासाठी कमाल मर्यादा पेक्षा कर्जमाफीचे लाभ दिले जाणार आहेत.
30 डिसेंबर पर्यंत दोन लाख रुपये पेक्षा जास्त मदत किंवा व्याजासह थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची खाती या योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
Mahatma Fule Karj Mafi Yojana
योजनेचे नाव | महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र सरकार महाविकसित आघाडी |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
योजना कधी सुरू झाली | 21 डिसेंबर 2019 |
योजनेचे उद्देश | शेतकऱ्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे आणि शेतकरी कर्जमुक्त व्हावा. |
हे पण वाचा :-राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कापसाला 15000 रुपये भाव मिळणार वाचा सविस्तर माहिती
महाराष्ट्र शासन लवकरच महात्मा ज्योतिबा फुले योजनेची तिसरी यादी जाहीर करणार असून पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांची तपासणी करून तिसऱ्या यादी त्या शेतकऱ्यांचा समावेश करणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांची तिसऱ्या यादीत नावे आली अशा सर्व शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी दिली जाणार आहे. या योजनेची यादी पाहण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्र व आपल्या ग्रामपंचायतला भेट देऊ शकता.
महाराष्ट्र शासनाने अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे. जी व्यक्ती मंत्री किंवा महाराष्ट्र राज्याचे लोकसभा राज्यसभा किंवा विधानसभा किंवा विधान परिषद अशा विविध संस्थेचे सदस्य म्हणून काम करीत असेल अशा व्यक्तीला या योजनेची पात्रता राहणार नाही.
याव्यतिरिक्त जी व्यक्ती बिगर कृषी श्रोतांतून आयकर भरतात या व्यक्तींनाही महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळणार नाही. तसेच ज्यांना मासिक पेन्शन 25 हजार रुपयापेक्षा जास्त आहे ते सुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. अपवाद माजी सैनिक वगळता.
यामध्ये राज्य सार्वजनिक उपक्रम महामंडळे आणि आधुनिक संस्थेचे काम करणारे व्यक्तीच्या ही समावेश आहे जर या व्यक्तींचे मासिक वेतन पंचवीस हजार पेक्षा जास्त असेल तर ते देखील या योजनेसाठी पात्र होत नाहीत.
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी तुम्हाला जवळच्या बँक मध्ये खाते उघडणे गरजेचे आहे.
- खाते उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि पासबुक घेऊन बँकेत जावा लागेल.
- त्यानंतर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्राची पूर्तता करावी लागेल कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्ताक्षरित केली जाईल.
- लक्षात ठेवा की महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना साठी कोणतीही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध नाही.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हे राज्य सरकारचे उद्देश आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पैशासाठी आत्महत्या करावी लागणार नाही आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या प्रबळ होईल.
या दृष्टीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना राज्यात चालू केली आहे. त्यामुळे या योजनेची जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घ्यावा व आपले कर्ज माफ करून घ्यावे.
हे पण वाचा :-सोयाबीनच्या बाजार भावा मध्ये चढ-उतार, पहा सोयाबीनचे आजचे बाजार भाव.
अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा