मुंबईसह राज्यात मोठे चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा मोठा इशारा; वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather News : मे महिना तापमानाचा असतो, असं आपण नेहमी म्हणत आलोय. पण यंदाचा मे काहीसा वेगळाच नजारा पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावरच वादळं, ढगांचा गडगडाट, वीजा आणि पावसाच्या सरी यामुळे राज्यातील हवामानामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘शक्ती’ या चक्रीवादळामुळे देशातील हवामान ढवळून निघालं असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे.

गेल्या 48 तासांपासून हवामानात सातत्यानं चढ-उतार दिसत असून, विशेषतः कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्र याठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वाढली आहे. Maharashtra Weather News

रायगडमध्ये यलो अलर्ट; 50 किमी वेगाने वारे!

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 18 मे 2025 पर्यंत रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर जाणं टाळावं, मोबाईल व लाईटीचे खांब दूर राहावं, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. वीज पडण्याच्या शक्यतेमुळे सर्वांनी काळजी घेणं अत्यावश्यक ठरणार आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची हजेरी; मे महिना पावसाळ्यासारखा!

मुंबई शहरासह ठाणे, वसई-विरार आणि इतर उपनगरांमध्येही हलक्याफुलक्या सरींचं आगमन झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 आठवडे राज्यात सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. खरंतर मान्सून अजून काही आठवड्यांवर येऊन ठेपलेला असतानाही, आतापासूनच राज्यात वळवाचा पाऊस व वादळांचा धोका कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे.

15 ते 22 मे काळात जोरदार पाऊस; या जिल्ह्यांना विशेष इशारा

हवामान अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार, सध्या अरबी समुद्र, तेलंगणा आणि विदर्भ भागावर चक्राकार वाऱ्यांची हालचाल सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या संपूर्ण हवामान बदलावर चक्रीवादळ ‘शक्ती’चं मोठं सावट असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी, नागरिकांनी आणि पर्यटकांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं ठरणार आहे. अवकाळी पावसामुळे शेती व प्रवासावर परिणाम होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

हे पण वाचा | मान्सून अंदमानमध्ये वेळेआधीच पोहचला, महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट!

Leave a Comment

error: Content is protected !!