Maharashtra Weather Forecast | राज्यामध्ये नुकताच काही भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले होते. या पावसाने विदर्भातील जिल्ह्यामध्ये शेतीच्या मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अक्षरशः शेतकऱ्यांचे पीक मातीमोल झाले होते.
काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे. ज्या ठिकाणी गारपीट झाले त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया गेला आहे.
या कारणामुळे बळीराजा मोठा संकटामध्ये सापडला आहे. कारण शेतीला केलेले अतोनात खर्च आणि त्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या अशा संकटामुळे शेतकरी खचून गेला आहे.
परंतु अशाच पुन्हा एकदा राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रातील हवामानामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या ठिकाणी होणार अवकाळी पाऊस
भारतीय हवामान खात्याने शेतकरी चिंता वाढवणारी एक मोठी बातमी दिली आहे. आम्हाला दिलेल्या माहितीनुसार आगामी तीन दिवसाचे हवामान प्रमुख राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.
मात्र त्यानंतर राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. राज्यामध्ये २५ ते २६ फेब्रुवारीला अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
म्हणजेच विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे. खरंतर आधी देखील विदर्भातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.
आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज दिलासाने शेतकऱ्यांना मोदी धडकी बसून राहिले आहे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान होणार का या भीतीने शेतकरी अतुर झाला आहे.
भारतीय हवामान विभागाने विदर्भातच नाही तर मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचा अंदाज दिलेला आहे मुंबई आणि पुण्यात मात्र हवामान प्रमुख्याने कोरडे राहणार असे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
कोकण वगळता उर्वरित राज्यामध्ये ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. असा भारतीय हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.
One thought on “राज्यामध्ये या तारखेच्या दरम्यान; या जिल्ह्यामध्ये होणारा अवकाळी पाऊस, हवामान खात्याचा नवीन अंदाज”